no images were found
आज राजघराण्याची सून असती…!.- माधुरी दीक्षित
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची क्रेझ आजही कायम आहे. 80-90च्या दशकात माधुरी बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होती. आपल्या दिलकश अदांनी आणि अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही प्रसिद्ध अभिनेत्री डान्सर आणि निर्माती देखील आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितचं नाव तिच्या अनेक सहाय्यक पुरूष कलाकारांबरोबर जोडली गेली. इंडस्ट्रीत तिच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. पण माधुरीचं मन एका प्रसिद्ध क्रिकेटरमध्ये गुंतलं होतं. एका फोटोशूट दरम्यान माधुरीची प्रसिद्ध क्रिकेटरबरोबर ओळख झाली. पहिल्याच भेटीत माधुरी क्रिकेटच्या ऑलराउंडवरच्या प्रेमात पडली.
धकधक गर्ल ज्याच्या प्रेमात वेडी झाली होती तो क्रिकेटर होता अजय जडेजा. एका फोटोशूट दरम्यान दोघांची ओळख झाली. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये वेगळीच केमिस्ट्री रंगली. दोघांचे रोमँटिक फोटो त्यावेळेस खूप चर्चेत आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, अजय जडेजाला फिल्म इंडस्ट्रीत काम करायचं होतं आणि त्यासाठी माधुरीनं अनेक निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडे त्याचं नाव सुचवलं होतं. पण इतकं करूनही अजयचं फिल्मी करिअर काही होऊ शकलं नाही. असं म्हणतात माधुरी आणि अजय एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते पण त्यांचं प्रेम पूर्ण होऊ शकलं नाही. कधी दोघांचं कुटुंब तर कधी दोघांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या प्रेमाच्या आड आली. तेव्हा अजय जडेजा क्रिकेटचा राजकुमार मानला जायचा आणि माधुरीनं नुकतीच इंडस्ट्रीत एंट्री केली होती. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातून आली होती.
क्रिकेटर अजयच्या कुटुंबानं एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या माधुरीला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि दोघांच्या लव्हस्टोरीला पूर्ण विराम मिळाला. याच काळात अजयचं नाव मॅच फिक्सिंगमध्ये आलं होतं. त्यामुळे माधुरीनं देखील या नात्यात न राहण्याचा कायमचा निर्णय घेतला. माधुरीनं तिच्या आयुष्यात पुढे जाऊन डॉक्टर श्रीराम नेने यांच्याबरोबर लग्न केलं. अनेक वर्ष ती विदेशात राहत होती. 1999 साली लग्नानंतर माधुरीनं बॉलिवूडशी नातं कमी केलं. नवरा आणि मुलांबरोबर ती विदेशात सेटल झाली. मुलं मोठी झाल्यानंतर आता माधुरी पुन्हा एकदा इंडस्ट्रीत अँक्टिव्ह झाली आहे.