
no images were found
काँग्रेसने लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात – राऊत
संजय राऊतांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटबाबत भाष्य केलं आहे. अशातच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी लोकसभेच्या २५ जागांवर दावा सांगितला आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना डिवचत मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होईल. तसेच, आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार आहोत, असं संजय राऊतांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, “काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली, हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नसेल. तसेच, उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलं, हे आम्हाला माहिती आहे.”