Home क्राईम 2 शेतकऱ्यांवर पडली वीज; मृतदेहासह बैलगाडी पोहोचली घरी

2 शेतकऱ्यांवर पडली वीज; मृतदेहासह बैलगाडी पोहोचली घरी

0 second read
0
0
113

no images were found

2 शेतकऱ्यांवर पडली वीज; मृतदेहासह बैलगाडी पोहोचली घरी

नागपूर :  राज्यात सध्या पावसाचे थैमान चालू आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये विदर्भात वीज पडून एकूण सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील दोघांचा तर चंद्रपूर जिल्ह्यामधील तीन आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. बैलगाडीवर घरी परतणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर वीज पडली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. विदर्भामध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार सुरु असून रविवारी संपूर्ण दिवसभर पाऊस पडला. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मांगली गावातील सोमेश्वर पोपटकर आणि गुंडेराव गेडाम हे रेंगीने शेतातून घरी बैलगाडीवर परतत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. गुंडेराव यांचा मृतदेह चालत्या रेंगीमधून खाली कोसळला. तर सोमेश्वर पोपटकर यांचा मृतदेह रेंगीवर अडकून राहिला. वीज कोसळल्याची बैलांना कल्पना नव्हती. त्यामुळे बैलगाडी मालकाचा मृतदेह घेऊन थेट घरी पोहोचले. तेव्हा वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गावकऱ्यांना कळली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय…