
no images were found
१५ आणि १६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकीस्तानच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ आणि १६ सप्टेंबर रोजी उझबेकीस्तानच्या दौऱ्यावर जात आहेत. १५ सप्टेंबर रोजी समरकंद इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेच्या राष्ट्र प्रमुखांच्या २२ व्या बैठकीत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदे दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेच्या गेल्या दोन दशकातल्या कार्याचा आढावा घेण्यात येईल, भविष्यातील सहकार्याबाबतही चर्चा केली जाईल. प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्यांवरही या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक द्विपक्षीय बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.