no images were found
वॉर्डविझार्ड फुड्स आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करार
कोल्हापूर, : वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेज लिमिटेडला गुजरात सरकारबरोबर सामंजस्य करार (एमओयू) करताना अभिमान वाटत असून हा क्षण राज्यातील खाद्य उत्पादन क्षमतांचा विस्तार करण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वाचा क्षण आहे.
या क्रांतीकारी सामंजस्य करारावर सह्या करत गुजरातच्या विकासाला चालना देण्याची बांधिलकी अधोरेखित केली गेली. यावेळी डी. एच. शहा,आयएएस, गुजरात सरकारचे प्रतिनिधी व गुजरात अग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक. शीतल भालेराव, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि. यांनी करारावर सह्या केल्या.
या कराराअंतर्गत वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि.च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव यांनी गुजरातमध्ये विस्तार करून रेडी-टु-इट पदार्थ, मेयोनीज सॉस, फ्रोझन फुड्स व इतर पदार्थांचे उत्पादन वाढवणार असल्याचे सांगितले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामुळे या परिसरात विकासाच्या संधींना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल.
या धोरणात्मक करारामागचे कंपनीचे धोरण स्पष्ट करताना वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि.च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव म्हणाल्या, ‘या क्रांतीकारी उपक्रमासाठी गुजरात सरकारबरोबर करार करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आम्ही केवळ विस्तार करत नाहीये, तर एका क्रांतीची सुरुवात करत आहोत. गुजरात सरकारबरोबरची ही भागिदारी फक्त खाद्यपदार्थ उत्पादनासाठी करण्यात आलेली नाही, तर त्यातून गुजरातच्या आर्थिक चित्राला नव्याने आकार दिला जाणार आहे. आम्हाला विश्वास वाटतो, की या करारामुळे शाश्वत आर्थिक विकासाचा मा४ग खुला होईल आणि नजीकच्या भविष्या रोजगाराच्या ७५० संधींची निर्मिती होईल.’
हा सामंजस्य करार दोन्ही घटकांची राज्यात औद्योगिक विकास तसेच रोजगार निर्मितीला चालना देण्याची बांधिलकी अधोरेखित करणारा आहे. गुजरात सरकारने राज्यातील धोरणे व नियमांनुसार आवश्यक परवाने, नोंदणी, मान्यता आणि क्लियरन्स मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. हा धोरणात्मक करार वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेज लिमिटेडची नाविन्य, गुणवत्ता आणि सामाजिक विकासाप्रती अविरत बांधिलकी दर्शवणारा आहे.