Home औद्योगिक सॉलिस यानमार ने सोलिस एस ९० ट्रॅक्टर केला लाँच

सॉलिस यानमार ने सोलिस एस ९० ट्रॅक्टर केला लाँच

2 min read
0
0
19

no images were found

सॉलिस यानमार ने सोलिस एस ९० ट्रॅक्टर केला लाँच

कोल्हापूर, : सॉलिस यानमार हा आंतरराष्‍ट्रीय ट्रॅक्‍टर्स लिमिटेडचा प्रमुख ब्रॅण्‍ड भारतातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा पहिला पसंतीचा ब्रॅण्‍ड आहे. ग्‍लोबल ४डब्‍ल्‍यूडी ट्रॅक्‍टर तज्ञ प्रगत जपानी तंत्रज्ञानाने सुसज्‍ज ट्रॅक्‍टर्ससह कृषी गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरला आहे. भारतातील यशस्‍वी प्रवासाच्‍या ४ वर्षांना साजरे करत सॉलिस यानमारला किसान पुणे २०२३ प्रदर्शनामध्‍ये महाराष्‍ट्रातील शेतकऱ्यांसाठी एसी केबिन आणि प्रगत १२एफ प्लस १२आर ट्रान्‍समिशन असलेला शक्तिशाली ९० एचपी ४डब्‍ल्‍यूडी ट्रॅक्‍टर नवीन ‘सॉलिस एस९०’ लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. कंपनीची प्रगत ट्रॅक्‍टर्सची लाइन-अप देखील आहे – सॉलिस २५१६ ४डब्‍ल्‍यूडी, सॉलिस ४५१५ ४डब्‍ल्‍यूडी, सॉलिस ३२१०, सॉलिस ५५१५ यांसह यानमार वायएम ३४८ए ४डब्‍ल्‍यूडी. हे सर्व ट्रॅक्‍टर्स शेतकऱ्यांना सानुकूल उत्‍पादकता देण्‍यासाठी १०० वर्षांच्‍या जपानी तंत्रज्ञानासह डिझाइन करण्‍यात आले आहेत.
सॉलिस एस९० हा ९० एचपी ऑटो ४डब्‍ल्‍यूडी ट्रॅक्‍टर आहे, ज्‍यामध्‍ये ४-सिलिंडर ४०८७ सीसी सीआरडीआय टर्बो-चार्ज्‍ड इंजिन शक्‍तीसह १२एफ प्लस १२आर एफआर सिन्‍क्रोमेश शटल ट्रान्‍समिशन व सुपर क्रीपर आहे. ट्रेम स्‍टेज आयव्ही उत्‍सर्जन नियमांचे पालन करत हा ट्रॅक्‍टर २२०० आरपीएममध्‍ये ३७५ एनएम टॉर्कची निर्मिती करतो आणि शेतकऱ्यांना उच्‍च दर्जाची कार्यक्षमता देण्‍यासाठी आयपीटीओ क्‍लच आहे. ३,५०० किग्रॅ लिफ्ट क्षमतेसह हा हेवी वेट ट्रॅक्‍टर आहे. या ट्रॅक्‍टरमधील आधुनिक वैशिष्‍ट्ये शेतकऱ्यांना ३० हून अधिक कृषी उपयोजनांसह काम करण्‍यास सक्षम करतात. सॉलिस एस९० मध्‍ये शेतकऱ्यांना अधिक आरामदायीपणा देण्‍यासाठी पॉवर स्टिअरिंग (टिल्‍टेबल/टेलिस्‍कोपिक), प्रिमिअम ड्रायव्‍हर सीट, प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स आणि ऐरोडायनॅमिक फ्रण्‍ट हूड देखील आहे.
सॉलिस यानमारचा नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या सॉलिस एस९० ट्रॅक्‍टरसह प्रगतीशील शेतकऱ्यांचा पहिला पसंतीचा ब्रॅण्‍ड म्‍हणून स्‍वत:चे स्‍थान अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे. सॉलिस प्रॉमिस ‘खुशियाँ आपकी, जिम्‍मेदारी हमारी’मधून संचालित सॉलिस यानमारची सर्वसमावेशक २२- ९० एचपी रेंजसोबत अद्वितीय ५ वर्षांची वॉरंटी आणि ५०० तासांचे ऑईल चेंज कालावधी मिळतो, ज्‍यामधून ग्राहकांना अधिक समाधानाची खात्री मिळते. सॉलिस यानमार शेतकऱ्यांशी अधिकाधिक संलग्‍न राहण्‍यासाठी भारतभरातील ३५० हून अधिक डिलरशिप्‍सच्‍या व्‍यापक नेटवर्कचे कार्यसंचालन पाहते.
इंटरनॅशनल ट्रॅक्‍टर्स लिमिटेडचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रामण मित्तल म्‍हणाले, ”किसान पुणे महाराष्‍ट्र राज्‍यातील भव्‍य इव्‍हेण्‍ट आहे आणि आमच्‍यासाठी राज्‍यातील शेतकऱ्यांसोबत कनेक्‍ट होण्‍याकरिता, तसेच आमचे प्रगत जपानी तंत्रज्ञानावर चालणारे ट्रॅक्‍टर्स दाखवण्‍याकरिता उत्तम संधी आहे. ग्‍लोबल ४डब्‍ल्‍यूडी तज्ञ असल्‍याने आम्‍हाला आमचा सर्वात शक्तिशाली, मल्‍टी-स्पीड ९० एचपी ट्रॅक्‍टर सॉलिस एस९० लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. हा वैविध्‍यपूर्ण ट्रॅक्‍टर आहे, जो प्रदेशातील खडतर काळ्या मातीत असाधारण कार्यक्षमता वितरित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. आमचे सॉलिस प्रॉमिस ‘खुशियाँ आपकी, जिम्‍मेदारी हमारी’प्रती बांधील राहत आम्‍हाला प्रत्‍येक प्रगतीशील शेतकऱ्याचा पहिला पसंतीचा ब्रॅण्‍ड असण्‍याचा आणि आमच्‍या नवीन उत्‍पादन विकासासह १०० वर्षांच्‍या जपानी वारसाला अधिक दृढ करण्‍याचा आनंद होत आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…