no images were found
देशाची प्रगतीमध्ये विद्यापीठांनी मोठया प्रमाणात योगदान देणे आवश्यक – रमेश बैस
कोल्हापूर – विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना आता फक्त शिक्षण देवून चालणार नाही तर देशाची प्रगती झपाटयाने होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यापीठांनी मोठयाप्रमाणात योगदान देणे आवश्यक आहे. मानवी कौशल्ये वृध्दींगत करण्याबरोबरच जागतिक मानांकनामध्ये राज्यातील विद्यापीठांचा कसा समावेश होईल हे पहाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महामहीम राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले. राजभवन मुंबई येथे महामहीम राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 62 हून अधिक विविध विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख सहभागी झाले होते. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत / 2047 : युवकांचा आवाज लौंच करण्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील राजभवन येथे आयोजित कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना यांना नवी दिल्ली येथून ऑनलाईन माध्यमातून संबोधित केले.दरम्यान, कार्यशाळेमध्ये कुलगुरू आणि संस्था प्रमुखांच्या सात गटांमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने, विद्यार्थ्यांची विचार क्षमता वाढविण्यासाठी कोणते उपाय उपयुक्त ठरतील. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठांमार्फत विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या पातळीवर सुरू असलेल्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी कार्यशाळेच्या चर्चासत्रामध्ये सहभागी होताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, विकसित भारतच्या अनुषंगाने विविध उपक्रमांमध्ये युवा पिढीस मोठया संख्यने सहभागी करून घेणे आवश्यक आहे. सक्षम युवकांच्या माध्यमातून देश सक्षम बनेल. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ.सरिता ठकार, डॉ.प्रकाश गायकवाड, डॉ.धनंजय सुतार, डॉ.शरद बनसोडे यांचेसह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.