no images were found
पीएच.डी.प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासाचे सातत्य महत्वाचे : प्रा.डॉ.प्रकाश पवार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पीएच.डी.प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासाचे सातत्य महत्वाचे असणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ प्रकाश पवार .यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्यावतीने पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी ‘पीएच. डी. प्रवेश परीक्षा तयारी’ याविषयावर ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे
होते.यावेळी उपकुलसचिव डॉ.एस.एम.कुबल,श्री.सी.एस.कोतमिरे उपस्थित होते.
प्रा.डॉ.पवार म्हणालेकी, पीएच.डी प्रवेश परीक्षेची तयारी करताना आवश्यक विषय व संशोधन पद्धती यांचा साकलण्याने अभ्यास करण्यासाठी सातत्य ठेवले पाहिजे. प्रथम व द्वितीय वर्षाचा आवश्यक विषयाचा अभ्यास करताना त्याच्यासाठी कोणती संशोधन पद्धती वापरलेली आहे. याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी क्रमिक पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे त्यातील आशय समजून घेणे महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी वापरली गेलेली संशोधन पद्धती अभ्यासली पाहिजे.त्यासाठी करण्यात आलेल्या वर्गीकरणाचे प्रकार तपासणे महत्त्वाचे आहे.
संशोधन पद्धतीचा अभ्यास करताना मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेची पुस्तके वाचणे आवश्यक आहे. विषयनिहाय कोश अभ्यासून संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. संशोधन ही प्रक्रिया आहे संशोधन म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध लावणे आणि विद्यार्थ्यांना संशोधन पद्धतीची तोंड ओळख होणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी विषयाचे कोश व संदर्भ ग्रंथ वाचणे महत्त्वाचे आहे.असे प्रा.डॉ.पवार म्हणाले.
प्रा.डॉ.मोरे म्हणाले की, पदवीव्युत्तर शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी संशोधन करण्याची तयारी ठेवली पाहिजे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती बाळगली पाहिजे.
स्वागत व प्रास्ताविक समन्वयक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. प्रकाश बेळीकट्टी करून दिली तर सूत्रसंचालन डॉ. प्रवीण लोंढे यांनी केले तर आभार सचिन भोसले यांनी आभार मानले.