
no images were found
कलाकार सांगत आहेत त्यांच्या सह-कलाकारांकडून अवलंबलेल्या सवयींबाबत
कौशल्ये व टॅलेण्ट याव्यतिरिक्त कलाकार त्यांच्या दैनंदिन नित्यक्रमामध्ये त्यांच्या सह-कलाकारांच्या सवयींचा अवलंब करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतो. एण्ड टीव्हीवरील कलाकार आपल्याला काही सवयींबाबत सांगत आहेत, ज्या त्यांनी त्यांच्या सह-कलाकारांकडून अवलंबल्या आहेत आणि अधिक प्रभाव घडवून आणण्यासाठी दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करत आहेत. हे कलाकार आहेत आयुध भानुशाली (कृष्णा, ‘दूसरी मॉं’), सपना सिकरवार (बिमलेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी, ‘भाबीजी घर पर है’). एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये कृष्णाची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली म्हणाला, “जयपूरमध्ये मालिका ‘दूसरी मॉं’च्या सेटवर आम्ही सर्व खूप धमाल करतो आणि एकमेकांकडून भरपूर काही शिकतो. पण सर्व सह-कलाकारांमध्ये नेहा जोशी (यशोदा) सर्वात परफेक्शनिस्ट व नीटनेटकेपणा राखणाऱ्या आहेत. त्या बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये ओळखल्याजातात आणि त्या पॅटर्न्स ओळखू शकतात, जे इतर कोणालाही जमत नाही. नेहा यांच्या या चांगल्या सवयींनी माझे लक्ष वेधून घेतले आहे. मी दिवसातून कधीही त्यांच्या रूममध्ये जातो तेव्हा सर्वकाही व्यवस्थित व टापटीप असते. त्यांचेइतके लक्ष असतेकी त्यांचा ब्रश थोडासा देखील हलला, तरी त्यांच्या ते लक्षात येईल. त्या त्यांच्या चुका कधीच लपवणार नाहीत, तर त्यामध्ये त्वरित सुधारणा करतात. त्यांची ही सर्वात चांगली सवय आहे, जी प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकारली पाहिजे. त्यांचा आदर्श घेत मी देखील माझ्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवण्यास सुरूवात केली आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा की असे केल्याने तुमचा अर्धा त्रास कमी होतो. मला गोष्टी शोधण्यासाठी अधिक वेळ घालवावा लागत नाही आणि मी इतर महत्वपूर्ण गोष्टींसाठी वेळ देऊ शकतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांच्या सवयी देखील प्रकर्षाने दिसून येतात.’’