Home मनोरंजन सुभाष घईंनी सांगितली  त्यांच्या दोन प्रसिद्ध गाण्यांमागची कहाणी 

सुभाष घईंनी सांगितली  त्यांच्या दोन प्रसिद्ध गाण्यांमागची कहाणी 

0 second read
0
0
75

no images were found

सुभाष घईंनी सांगितली  त्यांच्या दोन प्रसिद्ध गाण्यांमागची कहाणी 

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सत्र 13 मध्ये या रविवारी रात्री 8:00 वाजता ‘मुक्ता आर्ट्स’चे यश साजरे करण्यात येणार आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होणारे हे पहिले प्रॉडक्शन हाऊस आहे. या भागात खुद्द दिग्दर्शक सुभाष घई आणि त्यांची मुलगी मेघना घई उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्तम 12 स्पर्धक आपल्या सुरेल गाण्याने विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया या तिन्ही परीक्षकांना तसेच खास पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून सोडतील. आमंत्रित पाहुणे काही रंजक किस्से सांगतील. देबोस्मिता रॉय ही कोलकाताहून आलेली स्पर्धक ‘जा रे जा ओ हरजाई’ (कालीचरण) आणि तेरा नाम लिया (राम लखन) गाणी सादर करून मंचावर आपल्या आवाजाची जादू पसरताना दिसेल.देबोस्मिताने सादर केलेला अवाक करणारा परफॉर्मन्स पाहून परीक्षक विशाल दादलानी म्हणाला, “दोन्ही गाण्यांमधला तुझा एकही सुर चुकला नाही, ही सोपी गोष्ट नाहीये. असामान्य प्रतिभा असलेली व्यक्तीच एकापाठोपाठ एक अशी दोन गाणी इतक्या सहजपणे आणि सुरेल सादर करू शकते. हे गाणे म्हणायला सोपे नाही. उत्तम गायलीस देबोस्मिता!” थक्क झालेला हिमेश रेशमिया म्हणाला, “तू जितक्या समरसून हे गाणे म्हटलेस ते कौतुकास्पद होते. तुझ्या परफॉर्मन्समध्ये तुझा संघर्ष दिसला. मी हे अगदी खात्रीने सांगू शकतो की, तूच या सत्राची विजेती होणार.”

 देबोस्मिताचे गाणे ऐकून चकित झालेला सुभाष घई या दोन्ही गाण्यांचे किस्से सांगेल. ‘जा रे जा ओ हरजाई’ गाण्याविषयी बोलताना तो म्हणाला, “मी रेकॉर्ड केलेलं हे पहिलं गाणं होतं. कल्याणजी आणि आनंदजींकडून मी खूप काही शिकलो. लता जींनी जेव्हा हे गाणं ऐकलं, तेव्हा तिने याचा दिग्दर्शक कोण आहे, हे विचारलं, माझ्याकडे बघितलं आणि मला आशीर्वाद दिला.” यानंतर,‘तेरा नाम लिया’ गाण्याबद्दल तो म्हणाला, “या गाण्यात तरुणांना साडी नेसलेल्या रूपात दाखवले आहे, ती कल्पना मला शूटिंगच्या दिवशी सकाळीच सुचली होती. त्या दिवशी आमच्याकडे महिला डान्सर्स नव्हत्या. त्यामुळे आम्ही मुलांनाच घ्यायचे ठरवले आणि गंमत आणण्यासाठी त्यांना साडी नेसवली! या डान्समध्ये सामील होण्यासाठी अनिल कपूरला आम्ही हॉटेलमधून बोलावून घेतले होते.”इतकेच नाही, तर परीक्षक विशाल आणि होस्ट आदित्य नारायण हे ‘तेरा नाम लिया’ गाण्यातील मुलांनी साडी नेसण्याचे दश्य पुन्हा मंचावर साकार करताना दिसतील.

या वीकएंडला इंडियन आयडॉल 13 चे सर्वोत्तम 12 स्पर्धकअयोध्येचा ऋषी सिंह, कोलकाताचे बिदीप्ता चक्रवर्ती, अनुष्का पात्रा, देबोस्मिता रॉय, सोनाक्षी कर, सेंजुती दास, जम्मूचा चिराग कोतवाल, लखनौचा विनीत सिंह, अमृतसरचे नवदीप वडाली आणि रूपम भरनारिया आणि गुजरातचे शिवम सिंह आणि काव्या लिमये प्रेक्षकांचे भरूपूर मनोरंजन करून ‘मौसम म्युझिकाना’ करून सोडतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…