Home आरोग्य भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी जिल्हयातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची बैठक संपन्न

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी जिल्हयातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची बैठक संपन्न

12 second read
0
0
28

no images were found

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी जिल्हयातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची बैठक संपन्न

कोल्हापूर  : केंद्र शासनाने देशांतर्गत उनाड व भटक्या कुत्र्यांना ठार मारणेस बंदी करुन त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी पशु जन्म (उनाड व भटकी कुत्री) नियंत्रण कायदा 2001 अंमलात आणला आहे. सदरचे कायद्यानुसार उन्नाड व भटक्या कुत्र्याचे निर्बीजीकरण व लसीकरण करणेचे आदेश दिलेले आहेत. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण साठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एम.एम.शिंदे, सहा. आयुक्त डॉ.आर.एम.वडगावे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. सॅम लुद्रीक, महाराष्ट्र पशुवैद्यक संघटनेचे प्रतिनिधी डॉ. प्रविण नाईक तसेच महापालिकेच्या पॅनेलवरील पशुवैद्यक डॉ. वरुण धुप व डॉ. संतोष वाळवेकर उपस्थित होते

           महानगरपालिकेने शहरातील उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करणेकरीता सद्या दोन कुत्रा निर्बिजीकरण केंद्र कार्यान्वित केलेले असुन केंद्र क्र. 3 प्रस्तावित आहे. या ठिकाणी शहरातील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेकामी कुत्रा निर्बिजीकरण केंद्रामध्ये नियमित पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध नसलेने निर्बिजीकरण केंद्राकडील कामकाजामध्ये अडचण येत आहे. त्यानुसार कुत्रा निर्बिजीकरण केंद्राकडे कुत्रा निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरणाची संख्या वाढवणेसाठी आणखी पशुवैदयकिय डॉक्टर यांची नेमणूक करणेकामी दि. 8 डिसेंबर 2023 रोजी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व पशु वैद्यकीय डॉक्टर यांची बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली.

          या बैठकीमध्ये भटक्या कुत्र्यांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केलेली नसते त्यामुळे वैद्यकीय तपासणी खेरीज त्यांची शस्त्रक्रिया करणेत येते असलेचे पशुवैद्यकिय डॉक्टरांनी यावेळी सांगितले. डॉक्टरांना कुत्र्यांच्या शस्त्रक्रिये नंतर त्यांना असणाऱ्या आजारांची पार्श्वभुमी माहीत नसते त्यामुळे शस्त्रक्रिये नंतर गुंतागुंती होवू शकते. कुत्र्यांच्या आजाराबाबत माहिती सर्वांना असली पाहीजे. अशी शस्त्रक्रियेनंतर संबंधीत डॉक्टरांना कोणताही त्रास झाला नसला पाहीजे. त्याचबरोबर जिल्ह्यात पशुवैद्यक डॉक्टर यांची संख्या कमी असलेने व काही डॉक्टर शासनाकडे पुर्ण वेळ काम करीत असलेने डॉक्टर उपलब्ध होणे अडचणीचे आहे. त्यामुळे सदर काम करणेसाठी आठवड्यातुन दोन दिवस म्हणजे प्रत्येक शनिवारी व रविवारी डॉक्टर उपस्थित राहु शकतील असे सांगितले. त्याअनुषंगाने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी नवीन पशुवैद्यकीय डॉक्टर यांना प्रति कुत्रा निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण करणेकामी रु. 400/- इतके मानधन देवून पुर्ण वेळ डॉक्टरांची नियुक्ती करावी असे निर्देश सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील यांना दिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन   कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी …