no images were found
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाचा शहरात शुभारंभ
कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रा प्रभावीपणे राबवून केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने ज्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिम देशव्यापी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. 9/12/2023 ते 19/12/2023 या कालावधीत ही संकल्प यात्रा कोल्हापूर शहरात येत आहे. शहरात या विकसीत भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ शनिवार दि.09 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता राजारामपुरी येथील 9 नंबर शाळेच्या ग्राऊंडवर करण्यात येणार आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक प्रक्रियेत आणण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या यात्रेचे नियोजन प्रत्येक शहरात, गावागावात केले जात आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ही सर्वसामान्य घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा कार्यक्रम आहे. यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत प्रशासनाबरोबर पदाधिकाऱ्यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे ठिकाणी चित्ररथ फिरणार आहे. यामध्ये दि.9 डिसेंबर 2023 रोजी राजारामपूरी व मंगळवार पेठ, दि.10 डिसेंबर 2023 रोजी संभाजीनगर व कसबा बावडा, दि.11 डिसेंबर 2023 रोजी कळंबा व महालक्ष्मी मंदीर (भवानी मंडप), दि.12 डिसेंबर 2023 रोजी सुभाषनगर व आर के नगर, दि.13 डिसेंबर 2023 रोजी एसटी स्टॅण्ड व सायबर चौक, दि.14 डिसेंबर 2023 रोजी सोन्यामारुती चौक व गंगावेश, दि.15 डिसेंबर 2023 रोजी रंकाळा तलाव व सदरबाजार, दि.16 डिसेंबर 2023 रोजी सासने मैदान व शाहू मार्केट यार्ड, दि.17 डिसेंबर 2023 रोजी फुलेवाडी व उभा मारुती चौक, दि.18 डिसेंबर 2023 रोजी नागाळा पार्क व रमणमळा चौक, दि.19 डिसेंबर 2023 रोजी हुतात्मा पार्क चौक व उद्यमनगर याठिकाणी लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ व त्यांचे मनोगत घेतले जाणार आहे.