no images were found
पी एम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ९० % अनुदानाचा लाभ
पी एम कुसुम योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगले पीक घेता यावे म्हणून सोलर पंप बसवण्याची सुविधा पुरवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते.या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिली जाते. या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. पीएम कुसुम योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ही सरकारी योजना शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यात खूप मदत करते. शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्यूबवेल वापरतात. याद्वारे नापीक जमीन देखील वापरात आणली जाऊ शकते. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगल्या सुविधा मिळू शकतात. ही योजना ऊर्जा मंत्रालयाने २०१९ मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत ३०% अनुदान केंद्र सरकार, ३०% राज्य सरकार आणि ३०% इतर वित्तीय संस्थांद्वारे दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त १० टक्के रक्कम द्यावी लागेल. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना वीज आणि डिझेल खर्च करावे लागत नाही आणि त्यांचे विजेवरील अवलंबित्वही कमी होते. त्यामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.