no images were found
जिल्ह्यासाठी पुरेशी रासायनिक खते उपलब्ध होणार–जिल्हाधिकारी रेखावार
कोल्हापूर : सर्व खत कंपन्यानी मंजूर रेक प्लान प्रमाणे खते वेळेत उपलब्ध करून घ्यावीत, यासाठी कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीनी कंपनीकडे पाठपुरावा करावा, तसेच खत विक्रेत्यांना ही खते वेळेत उपलब्ध करुन द्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागाचे अधिकारी, खत कंपन्या, वाहतुकदार व विक्रेते यांची आढावा बैठक झाली.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी कृषि विभागाचे अधिकारी, खत कंपन्या, वाहतुकदार व विक्रेते यांना खत पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. ते म्हणाले, कृषि विक्री केंद्रातून रासायनिक खताची विक्री पॉस मशीनद्वारेच करायाच्या सूचनाही त्यांनी सर्व खतविक्रेतेत्यांना दिल्या. तसेच ‘कृषिक’ मोबाईल अॅपवर कृषि विभागामार्फत दररोज खत साठा अद्यावत केला जातो, त्यानुसार प्रत्येक कृषि सेवा केंद्रात खते उपलब्ध असतील याची विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी. बैठकीला जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमाशंकर पाटील, कृषि अधिकारी सतिश देशमुख, खत विक्रेते संघटनेचे विनोद पाटील, वाहतुकदार संघटना पदाधिकारी श्री. बागल, आर. सी. एफ., आय. पी. एल., झुआरी, गुजरात फर्टी., इत्यादी खत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.