
no images were found
ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीने हैराण झालाय अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या काळात हे कपल अतिशय ‘Ideal Couple’ म्हणून ओळखले जातात. बी-टाऊनमध्ये कितीही जोडपी बघितली तरी ऐश-अभिषेक हे असे जोडपे दिसते की, जे नवीन युगाचे असूनही, नातेसंबंधांच्या बाबतीत पारंपरिक भारतीय मूल्ये जपताना दिसतात. या दोघांनी आपल्या संसारात अनेक तडजोडी केल्या असतील पण पहिल्यांदाच अभिषेक ऐश्वर्याच्या एका सवयीबद्दल उघडपणे बोलला आहे.
अभिषेकला ऐश्वर्याची एक अशी सवय आहे जी अजिबातच आवडत नाही. एवढंच नव्हे तर त्याने ही सवय अतिशय जाहीरपणे मांडली आहे. असं अनेकदा होतं की, आपल्या जोडीदाराची एखादी सवय आपल्याला आवडत नसते पण फक्त ती प्रेमाखातर सहन केली जाते. ऐश्वर्याची अशी कोणती सवय आहे ती जाणून घेऊया.
जेव्हा अभिषेक आणि त्याची मोठी बहीण श्वेता बच्चन नंदा टॉक शो ‘कॉफी विथ करण’मध्ये पाहुणे म्हणून आले होते. या दरम्यान अभिषेकला ऍशच्या एका न आवडणाऱ्या सवयींबद्दल विचारलं. यावेळी अभिनेत्याने सांगितले की; ‘त्याला ऐश्वर्याचे पॅकिंग कौशल्य आवडत नाही आणि त्याला ते सहन करावे लागते.’ आपल्यापैकी अनेकांना अशा सवयी असतील. पण या सवयी सुधारल्या जाऊ शकतात. जाणून घ्या सुधारण्याच्या टिप्स.
अभिषेकने सांगितलेली सवय खूप कॉमन आहे. पिशवी व्यवस्थित पॅक करणे, तेही योग्य वस्तू निवडताना, हे प्रत्येकासाठी तितके नैसर्गिक कौशल्य नसते जितके सामान्यतः मानले जाते. हे कौशल्य शिकणे आणि पॅकिंगमध्ये मास्टर बनणे सोपे आहे. पण आपला वक्तशीरपणा आणि निटनेटकेपणा दुसऱ्यांसाठी घातक ठरू शकतो.
सहसा, जेव्हा जोडपे सहलीला जातात तेव्हा ते त्यांच्या दोन्ही वस्तू एकाच बॅगेत भरतात. त्या दोघांनी स्वतःच्या बॅगा पॅक करणे आणि ती घेऊन जाणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. यामुळे कोणालाही आपले सामान पॅक करण्याबाबत तडजोड करावी लागणार नाही. तसेच पॅकिंगच्या पद्धतीतही वादही होणार नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे की एक बॅग लहान आणि हलकी आणि दुसरी मोठी आणि जड असेल आणि नंतर पतीने दोन्ही बॅगा सोबत ठेवाव्यात असे होत नाही. अशा परिस्थितीत दोन बॅगा अडचण देखील ठरू शकते. यामुळे दोघांमध्ये वाद आणि चिडचिडही होऊ शकते