no images were found
शिवाजी विद्यापीठात जागतिक दिव्यांग दिना निमित्त ‘एक दिवशीय कार्यशाळा
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे युजीसी स्किम फॉर पर्सन्स व्हिथ डिसॅबिलीटीज अंतर्गत जागतिक दिव्यांग दिना निमित्त ‘दिव्यांग हक्क अधिनियम 2016 या कायदयाची अंमलबजावणी’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा दि. 4 डिसेंबर, 2023 रोजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना प्र-कुलगुरू म्हणाले दिव्यांग व्यक्तींनी कोणताही न्यूनगंड न बाळगता विविध येणाऱ्या संकटांना समर्थपणे पेलण्याची ताकद ठेवली पाहिजे. तसेच शिवाजी विद्यापीठ हे नेहमीच दिव्यांगाच्या सबलीकरणासाठी तत्पर असते. यासाठी कोणत्याही प्रकारची जबाबदारी अथवा मदत विद्यापीठाकडून नेहमीचे केली जाईल असे अश्वासन मा. प्र-कुलगुरू यांनी दिले. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती. स्वाती गोखले, यांनी दिव्यांगाचे कायदे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी दिव्यांगाच्या 21 प्रकाराबद्दल माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी असणारा दिव्यांग हक्क अधिनियम 2016 या कायदयामध्ये असणाऱ्या विशेष तरतुदीबाबत माहिती सांगितली व दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व स्तरावर संशोधन होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दुसरे प्रमुख वक्ते श्री. विकास चैगुले यांनी ‘‘वैश्विक दिव्यांगजन ओळखपत्र (यु.डी.आय.डी. कार्ड) माहिती’’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन कले तसेच यु.डी.आय.डी कार्ड काढत असताना येणाऱ्या अडचणीबाबत त्यांनी सांगितले व यु.डी.आय.डी कार्ड हे सार्वत्रिक ठिकाणी उपयोगात आले पाहिजे अशी आशा त्यांना व्यक्त केली.श्रीमती. साधना कंाबळे यांनी ‘‘शासनामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजना’’ या विषयावर मार्गदर्शन केले. दिव्यांगासाठी राष्ट्रीय पुरस्कार असतात यासाठी दिव्यांगानी अर्ज करणे गरजेचे आहे तसेच विविध शिषवृत्ती आणि योजना यांचा लाभ घेण गरजेचे आहे तसेच समाज कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजना, बॅंकांकडून देण्यात येणारे कर्ज याचा सुध्दा लाभ घेणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी समुपदेशक श्री. सत्यजित देसाई, श्री. वसीम सरकावस, डॉ. गंगाधर चव्हाण, श्री. विनायक सुतार, श्री. आकाश ब्राम्हणे, श्री. किशार गुरव यांनी उपस्थिती दर्शवली तसेच या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयांचे आणि अधिविभागांचे शिक्षक आणि दिव्यांग व इतर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रतिभा बी. देसाई, समन्वयक, युजीसी स्किम फॉर पर्सन्स व्हिथ डिसॅबिलीटीज यांनी केले. या कार्यशाळेचे आभार श्री. सतीश नवले यांनी मानले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्री. पवन कांबळे आणि अक्षता बिराजदार यांनी केले.