no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या योगासन संघांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी): शुक्रवार दि. ०१ डिसेंबर ते रविवार दि. ०४ डिसेंबर दरम्यान तामिळनाडू येथे संपन्न झालेल्या साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ योगासन स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या योगासन संघाने सुवर्ण पदक तर मुलांच्या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावत स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे नाव उंचावले. तसेच या दोन्ही संघांची निवड २५ ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान भुवनेश्वर (ओडिशा) या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी झाली आहे. सदर संघाचे मार्गदर्शक म्हणून श्री सुरेश धुरे तर संघ व्यवस्थापक म्हणून श्री संग्रामसिंह मोरे काम पाहत आहेत. वरीलसंघास विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ डी टी शिर्के ,प्र कुलगुरू मा. डॉ पी एस पाटील , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ शरद बनसोडे यांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.