Home शैक्षणिक ‘स्क्रीप्ट टू स्क्रीन’ विषयावर  विद्यापीठात एकदिवशीय कार्यशाळा

‘स्क्रीप्ट टू स्क्रीन’ विषयावर  विद्यापीठात एकदिवशीय कार्यशाळा

8 second read
0
0
45

no images were found

‘स्क्रीप्ट टू स्क्रीन’ विषयावर  विद्यापीठात एकदिवशीय कार्यशाळा

 
 
कोल्हापूर 🙁 प्रतिनिधी)शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने शनिवार दि. 9 रोजी चित्रपटविषयक एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली आहे. पुणे येथील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पडद्यामागची गोष्ट या पुस्तकाचे लेखक सुनिल नाईक ‘स्क्रीप्ट टू स्क्रीन’ या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीत सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल. दुपारी साडेचार वाजता समारोप होईल. ही कार्यशाळा विनामूल्य असून सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळेत सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी नाव नोंदणी करण्यासाठी  https://forms.gle/1ydxCyceBtXh2Cwy7 ही लिंक भरून सबमिट करावी तसेच अधिक माहितीसाठी पत्रकारिता अध्यासन तसेच मास कम्युनिकेशन विभागात संपर्क साधावा, असे आवाहन समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…