no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या मुलांच्या लाॅन टेनीस संघास सुवर्ण पदक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि. ३० नोव्हेंबर ते दि. ०४ डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेश येथे संपन्न झालेल्या वेस्ट झोन आंतर विद्यापीठ लाॅन टेनीस स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मुलांच्या संघाने सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे नाव उंचावले. या संघाची निवड अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय लाॅन टेनीस स्पर्धेसाठी झाली आहे.
संघामध्ये संदेश कुरळे, प्रथमेश शिंदे, पार्थ पाटील, अंकित बठेजा, कफिल कडवेकर व सदर संघाचे मार्गदर्शक म्हणून श्री मनाल देसाई तर संघ व्यवस्थापक म्हणून श्री डॉ आकाश बनसोडे काम पाहत आहेत. शिवाजीविद्यापीठचे कुलगुरू मा. डॉ डी टी शिर्के ,प्र कुलगुरू मा. डॉ पी एस पाटील , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे तसेच क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे यांनी खेळाडूना मोलाचे मार्गदर्शन केले.