no images were found
अंतराळात गरोदर राहिलेला जगातील एकमेव सजीव
अंतराळ हे अजून ही आपल्या शास्त्रज्ञासाठी गूढ बनून राहिले आहे. पृथ्वीचा जन्म, चंद्रावरील वातावरणे, परग्रहावर खरंच एलियनचे अस्तित्व आहे का? या सारखे एक ना अनेक प्रश्न डोक्यात पिंगा घालत असतात. जगभरातील शास्त्रज्ञ हे कोडं उलगडण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक संशोधनं करण्यात आली. काहींची उत्तरं सापडली असली तरी काही प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे अंतराळात सजीव जन्म घेऊ शकतात का? अंतराळात सजीव जगू शकतात का? याचे उत्तर शोधण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला.
आज आम्ही तुम्हाला अशा एका सजीवाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळं अंतराळात जीवन शक्य बनवले. विशेष म्हणजे, या जीवाने एक दोन नव्हे तर तब्बल 33 पिल्लांना जन्म दिला. तर जाणून घेऊया या सजीवाबद्दल जो अंतराळात गरोदर राहिली व तिथे पिल्लांनाही जन्म दिला.
आम्ही ज्या सजीवाबद्दल सांगत आहोत तो म्हणजे झुरळ. 2007मध्ये रशियाच्या वैज्ञानिकांनी होप नावाच्या एका रशियाच्या झुरळाला फोटोन-एम-बायो-सॅटेलाइटच्या मदतीने अंतराळात पाठवले आणि तिथेच झुरळ पिल्ल्यांना जन्म देण्याची वाट पाहू लागले. अंतराळात 12 दिवसांनंतर या झुरळाने 33 पिल्लांना जन्म दिला. विशेष म्हणजे, जन्मानंतर झुरळाची सगळी पिल्ले व्यवस्थित खात-पितदेखील होते.
सामान्यतः पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर झुरळाच्या पाठीवर हे पारदर्शी कवच असते. त्यानंतर कालांतराने त्यांच्या वयानुसार ते सोनेरी व्हायला लागते. मात्र, अंतराळात जन्म घेणाऱ्या झुरळांसोबत असं झालं नाही. त्यांच्या पाठीवरील कवच जन्मतःच काळे होते आणि कालांतराने ते अधिकच काळे होत गेले.
वैज्ञानिकांना जेव्हा अंतराळात जन्म घेतलेल्या झुरळांच्या शरीरावर हे विशेष बदल जाणवले. तेव्हा त्यांनी त्यावर संधोधन करण्यास सुरुवात केली. तेव्हा लक्षात आले की त्यांच्या शरीरातील हा बदल गुरुत्वाकर्षणामुळं झाला आहे. म्हणजेच गुरुत्वाकर्षणामुळं सजीवांच्या शरीरात हा बदल झाला. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते त्यामुळं पृथ्वीवर ज्या प्रमाणे गोष्टी घडतात तशा अवकाशात घडत नाहीत.