no images were found
2007 मधील करीना कपूर आणि शाहिद कपूरचा किस नामा
मुंबई : करीना कपूर ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. करीना कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर हिने काही वर्षे बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर याला डेट केले. इतकेच नाही तर हे दोघे लग्न करणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र, शाहिद आणि करीना कपूर यांचे अचानकपणे ब्रेकअप झाले. शाहिद कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यापासून करीना कपूर हिने सैफ अली याला तब्बल पाच वर्षे डेट केले. यानंतर 2012 ला तिने सैफ अली सोबत लग्न केले.
2007 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात चक्क करीना कपूर हिने शाहिद कपूर याची किस घेतला .पुरस्कार सोहळ्यात करीना कपूर हिला बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आनंदाच्या भरात थेट सर्वांसमोरच करीना कपूर हिने शाहिद कपूर याच्या गालाची किस घेतला.. ज्यानंतर सर्वचजण हैराण झाले.
विशेष म्हणजे करीना कपूर हिने किस घेतल्यानंतर शाहिद कपूर हा देखील हैराण झाला. करीना कपूर हिच्या या किसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या लग्नाला करीनाच्या आईचा विरोध असल्याचे सांगितले जाते.
करीना कपूर त्यावेळी टाॅप अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, त्या तुलनेत शाहिद कपूर तेवढा जास्त सक्सेस अभिनेता नक्कीच नव्हता. यामुळे करीना कपूर हिच्या आईचा या लग्नाला चांगलाच विरोध होता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले.