Home आरोग्य   पंतप्रधान  यांच्या हस्ते जनऔषधी केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

  पंतप्रधान  यांच्या हस्ते जनऔषधी केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

5 second read
0
0
29

no images were found

  पंतप्रधान  यांच्या हस्ते जनऔषधी केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

 

कोल्हापूर :   केंद्र शासनाच्या भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत श्री बलभीम विकास सेवा संस्था मर्या. पोखले, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या संस्थेसाठी मंजूर झालेल्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाले. त्यानंतर पोखले येथील या कार्यक्रमात जनऔषधी केंद्राचे उद्घाटन स्थानिक स्तरावर खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते व सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सीईओ संतोष पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, शाहूवाडी विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सहाय्यक निबंधक नारायण परजणे, बलभीम संस्थेचे अध्यक्ष धीरज नाईक, उपाध्यक्ष संताजी निकम, विद्यमान सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच डॉ.पांडूरंग निकम, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, संस्थेचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, प्रल्हाद पाटील, दत्तात्रय पाटील, सचिव विलास गायकवाड, राजेंद्र कोळेकर यांच्यासह वारणा समुहातील व पोखले गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 यावेळी देशातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र योजना यावेळी सुरु केले. कार्यक्रमा दरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर, झारखंड येथे ऐतिहासिक 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले. पुढे, श्री मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरुन 25,000 पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाची घोषणही केली. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेला आज १५ दिवस पूर्ण होत आहेत आणि आता यात्रेला वेगही आला आहे. ते पुढे म्हणाले, आरोग्य सेवा परवडणारी आणि सहज उपलब्ध करुन देणे हा पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या संकल्पनेचा आधारस्तंभ आहे. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्राची स्थापना हा या दिशेने एक प्रमुख उपक्रम आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी प्रशासनाकडून एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या हस्ते नागरिकांना मेडीकल किटचे वितरण करण्यात आले. यात  परवडणारी औषधे व सॅनिटरी किटचा समावेश होता. प्रा.जीवनकुमार शिंदे व प्रा.नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाचे फीत कापून खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन

पन्हाळा तालुक्यात दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसिद्धी चित्ररथाचे उद्घाटन फीत कापून खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार डॉ.विनय कोरे यांच्यासह सहकार आयुक्त अनिल कवडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते. या वाहनाद्वारे पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये संकल्प यात्रेबाबत प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…