no images were found
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले ‘ड्यूराशाईन® शॉपी’
छत आणि भिंतींच्या सर्व क्लॅडिंग सोल्युशन्सचा अनुभव घेता येईल तसेच रिटेल खरेदी करता येईल असे वन-स्टॉप डेस्टिनेशन, कराड, साताऱ्यातील शेतकरी आणि लघु, मध्यम उद्योजकांच्या मागण्या करण्यासाठी कंपनीने उचलले महत्त्वाकांक्षी पाऊल
कराड : टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने आपले प्रमुख रिटेल स्टोर ‘ड्यूराशाईन® शॉपी’ साताऱ्यातील केएच पोरवाल, कराड येथे आज सुरु केले. या जिल्ह्यामध्ये ब्रँडच्या रिटेल विस्तारात उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल आहे. सर्व कलर कोटेड स्टील उत्पादने आणि सोल्युशन्स एकाच ठिकाणी खरेदी करता येतील अशी वन-स्टॉप सुविधा टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने उपलब्ध करवून दिली आहे. या एक्सक्लुसिव्ह स्टोरमुळे कराड, सातारा भागातील ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवात तसेच प्रीमियम कोटेड स्टील उत्पादनांच्या उपलब्धते मध्ये लक्षणीय वाढ होईल.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या ड्यूराशाईन® रेन्जमध्ये शेती, व्यापार, निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांना उपयोगात आणता येईल अशी विविध उत्पादने आणि सुविधा उपलब्ध आहेत. ही उत्पादने प्रामुख्याने पशुपालन, पोल्ट्री फार्म्स, प्रोसेसिंग युनिट्स, बंगले, शेतीघरे, हॉटेल्स, रिसॉर्ट्स इत्यादींमध्ये उपयोगात आणली जातात. टिकाऊपणा, गंज प्रतिरोधक आणि दिसायलाही छान म्हणून नावाजला जाणारा ड्यूराशाईन® हा कलर कोटेड स्टील बाजारपेठेत सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड्सपैकी एक आहे.
‘ड्यूराशाईन® शॉपी’ हा आगळावेगळा, खिळवून ठेवणारा अनुभव देणारा कस्टमर एक्सपीरियन्स झोन आहे. याठिकाणी आल्यावर ब्रँडसोबत संवाद साधण्याची संधी मिळते, छत आणि भिंतींच्या क्लॅडिंगसाठी वापरली जाणारी, विविध आकर्षक रंगांची अनेक उत्पादने याठिकाणी प्रदर्शित केलेली असतात. यामध्ये टाईल्स, फॉल्स सीलिंगसाठी लायनर पॅनल आणि पार्टिशन्स यांचा समावेश आहे. याखेरीज खूप छान अस्थेटिक्ससाठी वूडलाईन आणि इन्स्युलेटेड शीट्ससाठी कूलशील्ड यासारखी नाविन्यपूर्ण उत्पादने देखील याठिकाणी उपलब्ध आहेत.
एक्सपीरियन्स झोनमध्ये ग्राहक उत्पादनांना स्पर्श करू शकतात, ती प्रत्यक्षात कशी आहेत ते समजून घेऊ शकतात. याठिकाणी तज्ञ सेल्स टीम असते त्यांच्याकडून प्रत्येक उत्पादनाची सखोल माहिती करून घेतली जाऊ शकते. उत्पादनाची जाडी, गॉज, मजबुती परीक्षण, ब्रँड मार्क डिस्प्ले इत्यादी नीट जाणून घेऊ शकतात. उत्पादनाचा प्रत्यक्ष अनुभव, त्याची कार्यक्षमता, किमतीचे पुरेपूर मूल्य आणि त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा हे सर्व याठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांना माहितीपूर्ण खरेदीचा उत्तम अनुभव घेता येतो.