Home राजकीय प्रदेश संघटक सचिव पदी’ विनय कदम यांची निवड       

प्रदेश संघटक सचिव पदी’ विनय कदम यांची निवड       

4 second read
0
0
44

no images were found

‘प्रदेश संघटक सचिव पदी’ विनय कदम यांची निवड         

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट ) महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदी कोल्हापूरचे विनय विश्वनाथ कदम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.शाहू ,फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत राजकीय वाटचाल करत असलेले विनय कदम हे पक्षाशी आतापर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून राहिले आहेत .प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही .बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के .पवार यांच्या हस्ते विनय कदम यांना नियुक्तीचे पत्र दिले. विनय कदम हे राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत .त्यांनी यापूर्वी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सुरुवातीला त्यांची राजकीय वाटचाल एन. एस. यु. आय .व युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल घाडगे. नितीन पाटील. गणेश जाधव .अश्विनी माने, पद्मा तिवले ,महादेव पाटील ,संदीप साळुंखे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…