Home राजकीय भाजपा जिल्हा कार्यालयात विविध आघाडी मोर्चा कार्यकारणी जाहीर

भाजपा जिल्हा कार्यालयात विविध आघाडी मोर्चा कार्यकारणी जाहीर

2 second read
0
0
43

no images were found

भाजपा जिल्हा कार्यालयात विविध आघाडी मोर्चा कार्यकारणी जाहीर
कोल्हापूर ( प्रतिनीधी ): भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने पक्षा अंतर्गत मंडल, आघाडी-मोर्चा स्तरावर संघटनात्मक नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. भाजपा जिल्हा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, प्रदेश महिला उपाध्यक्षा शौमीका महाडिक, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित नाना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या पूर्ण झाल्या.
मागील चार दिवसांत भाजपा जिल्हा कार्यालयात क.बावडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, उत्तरेश्वर या सात मंडलांच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, सुधीर देसाई, प्रकाश सरनाईक, सतीश पाटील-घरपणकर यांची मंडल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर युवा, महिला, ओ.बी.सी., अनु.जा, अल्पसंख्यांक या पाच मोर्चा व व्यापार, सोशल मिडिया, ज्येष्ठ कार्यकर्ता, सांस्कृतिक, उत्तर भारतीय, कायदा, मच्छीमार, क्रीडा, अभियंता (इंजिनिअर), बुद्धीजीवी, दिव्यांग, आध्यात्मिक, आय.टी, कामगार, वैद्यकीय, रिक्षा, अवजड वाहतूक, टेंपो वाहतूक, ट्रेव्हलर्स अशा जवळपास २० आघाडी – प्रकोष्ठांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अनुक्रमे गिरीष साळोखे, रुपाराणी निकम, संतोष माळी, अनिल कामत, आजम जमादार हे पाच मोर्चा अध्यक्ष त्याचबरोबर प्रग्नेश हमलाई, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, सतीश अंबर्डेकर, रामसिंह मोर्या, अड.परवेज खान, धीरज मुळे, अनुप देसाई, सुरज सनदे, संजय जासूद, सचिन सुराणा, किसन खोत, नरेंद्र पाटील, विजय गायकवाड, सयाजी आळवेकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आघाडी मोर्चा अध्यक्ष व पदाधिका-यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रके देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने भारत देशाला सक्षम नेतृत्व लाभले आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बूथ अभियान सक्षम करण्यासाठी, मोदीजींच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे तसेच राज्यात सक्षम सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यनशील असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी वर्ष हे निवडणुकांचे असून आपल्याला मिळालेली आजची नियुक्ती पद नसून जबाबदारी असल्याची उर्जावान भावना प्रत्येकाने मनाशी बाळगून बूथ स्तरावर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची चळवळ उभी करावी असे आवाहन केले.
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकारी यांचे अभिनंदन करून भाजपाच्या संघटनात्मक कार्यामध्ये प्रत्येक बूथ हा महत्वाचा असून बूथ सक्षम करण्यासाठी, शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे असे आवाहन केले.
आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रा लाभार्थी संवाद हा कार्यक्रम प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित पाहिला.
फोटो केप्शन :- आज भाजपा जिल्हा कार्यालयात ओबीसी मोर्चा, उत्तरेश्वर पेठ मंडल आणि रिक्षा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे, सरचिटणीस डॉ राजवर्धन, संजय सावंत, गायत्री राउत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम, प्र.का.सदस्य संदीप देसाई, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, ओबीसी अध्यक्ष संतोष माळी, ओबीसी प्र.का.सदस्य महेश यादव, रिक्षा आघाडी अध्यक्ष नरेंद्र पाटील, उत्तरेश्वर मंडल अध्यक्ष सतीश घरपणकर.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …