
no images were found
कार मागे घेताना तलावात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू; पोहता येत नसल्यामुळे करुण अंत
कार रिव्हर्स घेताना नियंत्रण सुटल्याने कार थेट औंढा नागनाथ येथील तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग महादेव मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या गयातिर्थ तलावात बुडाली. कारमधील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली.
हिंगोली : बुधवारी रात्री अंदाजे तीनच्या सुमारास औंढा नागनाथ येथील तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग महादेव मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या तलावात एक कार बुडाली. कार रिव्हर्स घेत असताना नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडला. कारमधील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथे चक्रधर सावळेचे औंढा नागनाथ येथे मंदिराच्या पूर्वेला टेन्ट हाऊसचे दुकान आहे. रात्री चक्रधर बाहेरगावाहून दुकानात आला. त्यावेळी कार रिव्हर्स घेत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट गयातिर्थ तलावात बुडाली. चक्रधर यांनी कारमधून बाहेर पडून पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
क्रेनच्या मदतीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आज मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. चक्रधर गजानन सावळे (२०, रा.निशाणा) असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.