
no images were found
पार्वतीच्या वेशातील तरुणाचा रंगमंचावर नाचताना मृत्यू
जम्मू: जम्मूच्या बिश्नेहमध्ये पार्वतीच्या वेशभूषेत नाचणाऱ्या तरुणाचा रंगमंचावर मृत्यू झाला. पार्वतीच्या वेशभूषेत नाचत असतनाच हा तरुण अचानक व्यासपीठावर कोसळला आणि परत उठलाच नाही. उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी काहींनी उपचारासाठी त्याला डॉक्टरांकडे नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मंगळवारी जम्मूच्या बिश्नेहमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रंगमंचावर योगेश गुप्ता नावाचा तरुण पार्वतीच्या पेहरावात नाचत होता. बराच वेळ नाचल्यानंतर तो व्यासपीठावर अचानक कोसळला. तो परत उठलाच नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.