Home क्राईम हातोड्यातून सोन्याची तस्करी, नागपूर विमानतळावर तिघांना अटक

हातोड्यातून सोन्याची तस्करी, नागपूर विमानतळावर तिघांना अटक

0 second read
0
0
147

no images were found

हातोड्यातून सोन्याची तस्करी, नागपूर विमानतळावर तिघांना अटक
नागपूर : दुबईतून चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आली आहे. या प्रकरणात तीन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळील लोखंडी हातोडा, स्टेपलर आणि इतर अवजारात लपवलेले 337 ग्रॅम सोने आढळले आहे.
हे साहित्य दुबई वरून भारतात घेऊन येणारा मजूर असून तो उत्तर प्रदेश मधील आजमगड येथील रहिवासी आहे. तर विमानतळावर त्याच्याकडून अवजारांची ती बॅग घ्यायला आलेले दोन्ही आरोपी राजस्थानच्या नागौरचे आहेत. त्यामुळे नागपूर विमानतळ हे परदेशातून होणाऱ्या सोने तस्करीचे नवे रूट तर बनले नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मजूरांनी सोन्याची तस्करी करण्यासाठी नवी शक्कल लढवली आणि पकडल्या जाऊ नये म्हणून हातोडा, मोठे स्टेपलर व इतर काही अवजारांमध्ये असलेल्या छिद्राच्या माध्यमातून त्यात सोने वितळून टाकले. अवजारांमध्ये सोने वितळून लपवले जाते आणि नंतर हे अवजार एखाद्या मजुराच्या माध्यमातून भारतात पाठवले जाते. सहा सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील आझमगडचा मजूर राहुल यादव दुबई वरून भारतात परत आला. आपल्याकडील अवजारांची बॅग त्याने नागपूर विमानतळावरील पार्किंगमध्ये अक्रम मलिक आणि इर्शाद खान नावाच्या नागौर जिल्ह्यातील दोघांच्या हवाली केली. दुबई वरून सोने तस्करी होत असल्याच्या संशयावरून आधीच विमानतळावर पाळत ठेवलेल्या नागपूर पोलिसांना तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी बॅग ची तपासणी केली आणि त्यात हातोडा, स्टेपलर आणि इतर अवजार पाहून ह्या वस्तू दुबई वरून विमानाने कशा आणि का आणल्या या प्रश्नांचे उत्तर तिघे देऊ शकले नाही. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील अवजारांची सोनारकडून तपासणी केली असता, छुप्या छिद्रातून 337 ग्रॅम सोने तस्करी केल्याचे उघड झाले.
तिन्ही आरोपींच्या आतापर्यंतच्या तपासाप्रमाणे आजमगडचा मजूर राहुल यादव याला दुबईत मोती खान नावाच्या व्यक्तीने एक बॅग भारतात आमच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा असे आमिष दिले होते. त्यासाठी राहुल यादवची दुबई वरून नागपूर पर्यंतच्या प्रवासाची विमानाची तिकीट. तसेच नागपूर वरून उत्तर प्रदेश पर्यंतच्या रेल्वे प्रवासाच्या तिकीटांची व्यवस्था करून दिली होती. सोबतच नागपूर विमानतळावर कोणाकडे ही बॅग सोपवायची आहे, त्या व्यक्तींचे फोटोही राहुल यादव कडे देण्यात आले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घरफाळा देयकामधील चालू मागणीवर दि.30 जून अखेर करामध्ये 6 टक्के सवलत योजना ऑनलाईन पे करण्यासाठी यावर्षीपासून बिलावर क्यु-आर कोड छपाई

घरफाळा देयकामधील चालू मागणीवर दि.30 जून अखेर करामध्ये 6 टक्के सवलत योजना ऑनलाईन पे करण्यास…