
no images were found
कळंबा कारागृहात ‘मोका’खाली अटकेतील कैद्याची आत्महत्या
मोका कारवाईखाली अटकेत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भरत घसघसे या आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याने खिडकीला कापडाची पट्टी बांधून आत्महत्या केली. आज पहाटे ही घटना उघडकीस आली.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मोकांतर्गत कारवाई झालेल्या सांगली जिल्ह्यातील कैद्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. भरत बाळासाहेब घसघसे (वय ३०, रा. आष्टा वाळवा सांगली) असे त्याचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, भरत घसघसे हा मोकांतर्गत गुन्ह्यात 2019 पासून कळंबा कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून होता. त्याने काल पहाटेच्या सुमारास सर्कल क्रमांक सात विभक्त कोठडी क्रमांक सात येथील शौचालयाच्या खिडकीस कापडी पट्टीने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अशी माहिती प्रभारी अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी दिली.