no images were found
कार्तिकी एकादशीची शासकीय पूजेच्या परंपरेमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा अनेकदा वादात सापडली आहे. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना मिळतो. महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस की अजित पवार यापैकी नेमकं कोण विठ्ठलाची सपत्नीक पूजा करणार, हा प्रश्न भाविकांना पडला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला यापूर्वीच विरोध केला आहे. अशातच कोळी समाजानेही विरोधाची तलवार उपसली आहे. कोळी समाजाला महादेव कोळी असा जातीचा दाखला मिळावा; जोपर्यंत सरकार आमची मागणी पूर्ण करत नाही, तोपर्यंत एकाही मंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही; असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला होता.
कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे