no images were found
झी टीव्हीची ‘इक कुडी पंजाब दी’: लवचिकतेची एक आकर्षक कथा!
भेटा हीर कौर विर्कला, पंजाबमधील जाट कुटुंबात जन्मलेली एक सुंदर, उत्साही तरुणी. जबरदस्त फूडी प्रेमाने चटोरी म्हणतात, ही उत्साही सीखणी एक भावी वकील आहे. तिचे वडीलच तिची कमजोरी आणि ताकद आहेत आणि तिला काहीही असो, जे योग्य आहे त्यासाठी उभे राहण्यास शिकवले आहे! तिच्या कुटुंबाचे कल्याण आणि तिचे वडील हेच तिचे सर्वात मोठे प्राधान्य आहे. पण, तिच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येते जेव्हा तिचे अटवाल कुटुंबात लग्न होते. एका घटनेमुळे तिच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते. आपल्या आंतरिक शक्तीतून प्रेरणा मिळवून अन्यायाचा सामना करण्याचा आणि एका फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उंच भरारी मारण्याच्या तिच्या जीवनप्रवासाला ह्या मालिकेतून रेखाटण्यात आले आहे. हीरचा प्रवास सुंदर तनिषा मेहताने जिवंत केला असून टेलिव्हिजन हार्टथ्रोब अविनेश रेखी तिच्या बालपणीच्या मित्राची भूमिका करणार आहे, रणजीत उर्फ रांझा जो तिच्या पाठीशी उभा आहे आणि तिला कधीही त्रास होऊ देत नाही! डोम एंटरटेनमेंट निर्मित, ‘इक कुडी पंजाब दी’ ची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून होईल आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता झी टीव्हीवर प्रसारित केली जाईल.
झी टीव्हीच्या बिझनेस हेड अपर्णा भोसले म्हणाल्या, “इक कुडी पंजाब दी’ सह, आम्ही आमच्या प्रेक्षकांची हीर आणि जीवन बदलून टाकणाऱ्या घटनेनंतर तिच्या परिवर्तन आणि लवचिकतेच्या प्रवासाची ओळख करून देतो. डोम एंटरटेनमेंटसोबत पुन्हा एकदा सहकार्य करताना आणि ताकदीची ही प्रेरणादायी कथा प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे.”
डोम एंटरटेनमेंटचे निर्माते मोहम्मद मोरानी आणि मजहर नाडियादवाला म्हणाले, “झी टीव्हीवरील आमचा पुढचा फिक्शन शो पंजाबची अचूक नाडी पकडतो. आपले सत्य सांगण्याच्या आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या हीरच्या आवेशपूर्ण संघर्षाचे चित्रण करणारे हे एक गहन कौटुंबिक नाट्य आहे. आपला बालपणीचा मित्र रांझासह, ती ज्या तीव्र निर्धाराने ती संकटांना तोंड देते ते प्रेक्षकांना जबरदस्त आवडेल. आमच्या या मालिकेत एक से एक उत्तम कलाकार आहेत आणि आम्ही यात अस्सलपणा आणण्यासाठी चंदीगड आणि अमृतसरमधील वास्तविक लोकेशन्सवर मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण केले आहे.”
अविनेश रेखी म्हणाला, “रांझासारख्या व्यक्तिरेखेसह मी आदर्श माणूस कसा असावा याविषयीची माझे विचार बदलण्याची वाट पाहत आहे. मला विश्वास आहे की शोची कथा आणि कथानक आकर्षक आहे आणि ते तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल. खरं तर, ‘इक कुडी पंजाब दी’ मानवी चैतन्याची ताकद आणि नातेसंबंधांची चिरस्थायी शक्ती दर्शविते. माझ्या चाहत्यांनी माझ्या आधीच्या शोसाठी मला प्रचंड प्रेम दिले आहे आणि मला आशा आहे की ते माझ्या या नवीन प्रवासातही मला साथ देतील.”
तनिषा मेहता म्हणाली, “इक कुडी पंजाब दी’ चा एक भाग बनून आणि हीर सारख्या पात्राला जिवंत करताना मला खूप आनंद झाला आहे. पंजाबच्या गल्लीबोळातून जाणे, शोसाठी सुंदर तसेच नाट्यमय दृश्यांचे शूटिंग करणे हा एक आकर्षक अनुभव आहे. ही प्रेम, लवचिकता आणि अनोख्या मैत्रीच्या अतूट बंधाची चित्तथरारक कथा आहे. मला विश्वास आहे की हीरची व्यक्तिरेखा अतिशय विचारपूर्वक विकसित केली गेली आहे. मी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल तसेच या शोबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांसाठी उत्सुक आहे.”