Home सामाजिक कुंभार समाजाच्या बापट कॅम्प येथील जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न मार्गी लावा : राजेश क्षीरसागर

कुंभार समाजाच्या बापट कॅम्प येथील जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न मार्गी लावा : राजेश क्षीरसागर

1 second read
0
0
25

no images were found

कुंभार समाजाच्या बापट कॅम्प येथील जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न मार्गी लावा : राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर  : कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटी लि. कोल्हापूर हि संस्था सन १९५७ साली स्थापन करण्यात आली आहे. सदर संस्थेअंतर्गत नोंदणीकृत सभासदांना व्यवसायासाठी बापट कॅम्प येथील सुमारे २९ एकर २५ गुंठे इतकी जागा सन १९६४ मध्ये कब्जापट्टीद्वारे देण्यात आली आहे. या जागेचे संस्थेने गरजू व पात्र सभासदांना वाटप केले होते. परंतु गेल्या दहा वर्षात कुंभार समाजातील पात्र सभासदास जागा हस्तांतरित करण्याचे काम थांबले असल्याने सभासदांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार प्लॉट हस्तांतरित करण्यास, कर्ज बोजा नोंद होण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून सदर जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.

कुंभार समाजाच्या प्लॉट हस्तांतरण, कर्ज बोजा आदी विषयी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

या बैठकीच्या सुरवातीस माहिती देताना कुंभार समाजाच्या वतीने, संस्थेची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर शहरातील रहिवासी भागातील वीटभट्ट्या व इतर कुंभारकामामुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या कारणास्तव शासनाने श्री संत गोरा कुंभार वसाहत बापट कॅम्प या ठिकाणी कुंभार समाजासाठी सुमारे २९ एकर २५ गुंठे जागा देवून त्यांचे व्यवसाय स्थलांतर करून पुनर्वसन केले. संस्थेच्या पात्र सभासदांना याचे वाटपही करण्यात आले. सदर जागा हस्तांतरण करण्यास संस्थेच्या मान्यतेचा ठराव बंधनकारक आहे. बिगर सभासदाला जागा हस्तांतरित करताना मा.जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वास्तविक पाहता त्यापूर्वी संस्थेच्या मान्यतेने सभासद आपआपसांत जागा हस्तांतरित करण्याची प्रकिया पार पडली आहे. परंतु, आजातागात संस्थेने बिगर सभासदास कोणतीही जागा हस्तांतरित केलेली नसताना गेल्या १० वर्षापासून सभासदांना जागा हस्तांतरित करण्याचे काम थांबले आहे.
यासह कोल्हापूर शहरातील रहिवासी भागातील वीटभट्ट्या व इतर कुंभार कामामुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या कारणास्तव सन १९७८ साली तत्कालीन कोल्हापूर नगरपालिका प्रशासकांनी बापट कॅम्प येथील वाढीव जागा कुंभार समाजास दिली आहे. परंतु सदर कुंभार व्यावसायिकांच्या सन २०१८ सालच्या ७/१२ वर भोगवटादार वर्ग १ अशी नोंद होती. त्यानंतर सन २०१९ सालच्या ७/१२ वर भोगवटादार वर्ग २ अशी नोंद झाल्याने कुंभार कारागिरांना जागा हस्तांतर करता येत नाही किंवा सदर जागेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता येत नाही. त्यामुळे कुंभार व्यावसायिक जागा असूनही आर्थिक विवंचनेत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेंव्हा भोगवटादार वर्ग २ ची नोंद रद्द होवून भोगवटादार वर्ग १ नोंद पूर्ववत करणेची मागणी केली.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, या दोन्ही बाबतीत सविस्तर बैठक घेवून कुंभार समाजाच्या जागेच्या मालमत्ता पत्रकासंदर्भात असणाऱ्या सर्व अडचणी दूर कराव्यात असे सूचित केले. यासह कब्जापट्टीद्वारे वितरीत केलेली जमीन मालकी हक्काद्वारे कुंभार समाजातील सभासदाला देण्याच्या दृष्टीने सदर संस्थेकडून आलेल्या प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देण्याच्या सूचनाही श्री.क्षीरसागर यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी, मालकी हक्कासंदर्भातील प्रस्ताव संस्थेच्या सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन केले. यासह भोगवटादार वर्ग १ नोंद पूर्ववत करण्याबाबत नियमानुसार आवश्यक कारवाई करण्याचे आदेश संबधित तहसीलदार यांना दिले.
यावेळी जिल्हा भूमापन अधिकारी सुदाम जाधव, नगर भूपान अधिकारी शशिकांत पाटील, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे, महसूल तहसीलदार सरस्वती पाटील, मंडल अधिकारी संतोष पाटील, मुख्य तलाठी विपिन उगलमुगले, कनिष्ठ लिपिक अस्मिता काकोडकर, शिवसेना उपशहरप्रमुख अभिजित कुंभार, माल उत्पादक सोसायटी चेअरमन महिंद्र नागांवकर, मूर्तिकार संघटना अध्यक्ष प्रमोद कुंभार, कोल्हापूर शहर कुंभार सोसायटी संचालक शांताराम माजगावकर, विजय पुरेकर, शिवाजी कुंभार, एकनाथ माजगावकर, चंद्रकांत कुंभार, कमलाकर आरेकर, राकेश वडणगेकर, आशिष पाडळकर आदी कुंभार समाजाचे सभासद उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…