
no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील विद्यार्थ्यानी एडयूरिफॉर्म या प्रकल्पातंर्गत घेतली परदेशी झेप
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागामध्ये एडयूरिफॉर्म हा आंतराष्ट्रीय प्रकल्प सन 2021 पासून सुरू आहे व या प्रकल्पास यूरोपियन युनियनच्या इरॅस्मस प्लस प्रोग्रॅमद्वारे निधी मिळाला आहे. सदर प्रकल्पाचा मुख्य हेतू चौथ्या औद्योगिक क्रांतीला सामोरे जाण्यासाठी तसेच एकविसाव्या शतकातील कौशल्ये विद्यार्थ्यामध्ये रूजविण्यासाठी व शिक्षणातून कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी सेवापूर्व व सेवांतर्गत शिक्षंकाना योग्य प्रशिक्षण देणे हा आहे. या प्रकल्पातंर्गत एकूण 22 नवनविन अध्यापन पध्द्ती विकसित करण्यात आलेल्या आहेत. व त्यांचे प्रशिक्षण शिक्षणशास्त्र विभागातील विद्यार्थी शाळांमधील शिक्षक यांना देण्यात येत आहे व याचा
लाभ जवळजवळ 200 शिक्षकांनी घेतलेला आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून शिक्षणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यासाठी स्टूडंट मोबिलीटी प्रोग्राम राबविण्यात आला यामध्ये विभागातील विद्यार्थी अपराजिता कनोजिया, सीमा पाल, अश्विनी शिंदे, सुषमा नेहारकर, राखी नागराळे, तन्वी माने, मर्सी फर्नाडिंस, सुनीता गौतम लॅटव्हिया ;लॅटव्हिया यूनिव्हर्सिटीध्द, इटली, ;लिसिओ आर्टिस्टिको म्युझिकेल कोरेटिको कॅडियानी-बाउश, बुस्टो अर्सिझियो व इटालीयन यूनिव्हर्सिटी लाइनध्द जर्मनी हैंम्बंर्ग यूनिव्हर्सिटीध्द या यूरोपियन देशांमधील विद्यापीठांमध्ये जाऊन तीन आठवडयांचे शिक्षक शिक्षण कार्यक्रमातील इंटर्नशिप पूर्ण केले.
त्याचप्रमाणे विभागातील विद्यार्थी दिगंबर जोशी, उमेश बेनके, संतोष वसेकर, पूनीतकुमार पटले, मयूरी पटले, अतूल जाधव, मानसी शेळके, संजय खांडेकर, देवेंद्र हिरूळकर, तेजश्री पाटील, पूण्यश्री रेंजन, श्रूती शिंदे, सूरज शिंदे, प्रशांत भजनवाले, स्वाती पंडूरकर, आश्विनी काळे, भारतामधील महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा, गुजरात, चितकारा विद्यापीठ व इंटरनॅशनल स्कूल, पंजाब सीएक्सएस साल्युशन, केरळ व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे देखील या विद्यार्थी तीन आठवडयांचे शिक्षक शिक्षण कार्यक्रमातील इंटर्नशिप पूर्ण केले. शिक्षणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना प्रथमच अशाप्रकारे बाहेरच्या देशांमध्ये व भारतामधील विद्यापीठांमध्ये शिक्षक प्रशिक्षणाचा भाग पूर्ण करण्याची संधी मिळणे ही विभागाच्या व शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टिने अभिमानाची बाब आहे.
शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख एडयुरिफॉर्म प्रकल्पाचे समन्वयक डॉ. प्रतिभा.सु. पाटणकर, डॉ. विद्यानंद.सं.खंडागळे, एडयुरिफॉर्म प्रकल्पाचे सह-समन्वयक, सर्व प्राध्यापक सदस्य आणि इनोव्हेशन मॅनेजर डॉ. गीतांजली जोशी यांनी यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव
विलास शिंदे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाले.