Home आरोग्य कुष्ठ व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहिमेंची सुरुवात

कुष्ठ व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहिमेंची सुरुवात

4 second read
0
0
51

no images were found

 कुष्ठ व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहिमेंची सुरुवात

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये दि. 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत ” कुष्ठरुग्ण शोध मोहीम (LCDC)” व “सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम (ACF)” राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेकरिता जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण मिळून 34 लाख 85 हजार 149 इतकी लोकसंख्या निवडली असून या लोकसंख्येमध्ये 6 लाख 97 हजार 30 इतक्या घरांमध्ये तपासणी केली जाणार आहे व एकूण 2 हजार 684 इतक्या टीम तयार केल्या गेल्या आहेत. या टीममध्ये सुमारे 5 हजार 367 कर्मचारी व 537 पर्यवेक्षक काम करणार आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक/सेविका आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, प्रत्यक्ष जाऊन घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची व कुष्ठरुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. निदान झाल्यास मोफत उपचार केला जाणार आहे.

q कुष्ठरोगाबाबतची लक्षणे :-

· त्वचेवर फिकट अथवा लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, तेलकट / चकाकणारी त्वचा त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे.

· त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे.

· सतत हातापायात मुंग्या येणे.

· न बरी होणारी जखम असणे, क्वचित प्रसंगी हातातून वस्तू गळून पडणे किवा चालतांना पायातून चप्पल गळून पडणे.

q क्षयरोगाची प्रमुख लक्षणे-

· २ आठवडे व त्यापेक्षा जास्त काळाचा खोकला.

· संध्याकाळी येणारा ताप.

· भूक न लागणे, वजन घटणे,

· थुंकीतून रक्त पडणे,धाप लागणे इ. फुप्फुसाच्या टीबीमध्ये लक्षणे आढळतात

फुप्फुसाव्यतिरिक्त टीबीमध्ये मानेवर गाठी,लसिकाग्रंथीना सूज येणे, पोटात दुखणे, अपचन, संडासला त्रास होणे. सांध्यांना सूज येणे, मणक्यांमध्ये दुखणे, व्यंधत्व इ. लक्षणे आढळतात

जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निश्चित केले असून समाजातील निदान न झालेले कुष्ठ व क्षय रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे हा या मोहिमेचे उद्देश आहे. वरीलप्रमाणे लक्षणे असल्यास आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्याकडून मोहिमेदरम्यान तपासणी करुन घ्यावी, असे अवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.पी.ए.पटेल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.माधव ठाकूर यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …