Home औद्योगिक कोण आहे भक्ती मोदी? रिलायन्स रिटेलमध्ये कोणती जबाबदारी

कोण आहे भक्ती मोदी? रिलायन्स रिटेलमध्ये कोणती जबाबदारी

6 second read
0
0
33

no images were found

कोण आहे भक्ती मोदी? रिलायन्स रिटेलमध्ये कोणती जबाबदारी

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या रिटेल व्यवसायावर खास लक्ष देत आहे. रिटेल शॉपची चेन भारतभर पसरत आहे. आता शिल्पकार आणि कुशल कारागिरांसाठी खास प्लॅटफॉर्म समोर आणण्यात आला आहे. रिलायन्स रिटेलची जबाबदारी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या खांद्यावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स रिटेलमध्ये भक्ती मोदी या चांगल्याच सक्रीय झाले आहे. काही वृत्तानुसार, रिलायन्स रिटेलमध्ये भक्ती मोदी यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात येऊ शकते.
     भक्ती मोदी यांचे नाव सातत्याने पुढे येत आहे. त्यांच्यावर जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. अंबानी कुटुंबियांचे अगदी जवळचे असलेले मनोज मोदी यांची ती मुलगी आहे. मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचा उजवा हात असल्याचे बोलले जाते. दोन्ही कुटुंबियात घनिष्ट आणि जुने संबंध आहेत. भक्तीने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे ती रिलायन्स रिटेलमध्ये सक्रीय झाली आहे.
     ईटीच्या एका अहवालानुसार, भक्ती मोदी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या लीडरशिप टीममध्ये आहे. या वृत्तानुसार, काही महिन्यांपासून रिलायन्स रिटेलमध्ये भक्ती मोदीची सक्रियता वाढली आहे. तिच्याकडे सध्या रिलायन्स रिटेलची स्ट्रेटर्जी आणि न्यू बिझनेस इनिशिएटिव्हची जबाबदारी आहे. तिच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
भक्ती मोदी ब्युटी प्रोडक्टसाठी ओम्नी चॅनल प्लॅटफॉर्म टिरा मध्ये स्ट्रेटर्जी आणि एक्झिक्युशनचे काम पाहते. ती टिराची सह-संस्थापक पण आहे. टिरा हा प्लॅटफॉर्म एप्रिल 2023 बाजारात दाखल करण्यात आला. भक्ती मोदीला ऑगस्ट 2022 मध्ये रिलायन्स ब्रँड्समध्ये संचालक पदी नेमण्यात आले होते. रिलायन्स ब्रँड्सची जागतिक लक्झरी ब्रँड्सोबत पार्टनरशीप आहे. नंतर भारतीय बाजारात त्याची विक्री करण्यात येते.
      भक्ती मोदीचे वडील मनोज मोदी अनेक वर्षांपासून मुकेश अंबानी यांचे जवळचे सहकारी आहेत. रिलायन्सच्या जगतात मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जातात. ते रिलायन्स रिटेल, ईआयएच आणि जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बोर्डात सक्रिय आहेत. मुकेश अंबानी यांचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. त्यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…