no images were found
धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूची होणार खरेदीॽ
धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी लोक उत्तम नशीब व समृद्धतेचे प्रतीक म्हणून नवीन वस्तू खरेदी करतात. या दिवसाच्या महत्त्वाबाबत सांगताना एण्ड टीव्हीवरील कलाकार मोहित डागा (अशोक, ‘दूसरी मॉं), हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’) यांनी या दिवशी ते करणाऱ्या खरेदीबाबत सांगितले. मालिका ‘दूसरी मॉं’मधील मोहित डागा ऊर्फ अशोक म्हणाले, ”धनत्रयोदशी हा आमच्या घरामध्ये परंपरागत व श्रद्धेने साजरा केला जाणारा खास सण आहे. आम्ही दिवसाच्या सुरूवातीला आमच्या घराची साफसफाई करतो आणि त्यानंतर खरेदीला जातो. खरेदी केल्यानंतर आम्ही धनत्रयोदशी पूजा करतो, ज्यानंतर सर्व पारंपारिक प्रथांचे पालन करतो. यंदा, मी माझी पत्नी व मुलीसोबत खरेदीला जाणार आहे आणि त्यांना दिवाळी सणासाठी नवीन कपडे व आभूषणे खरेदी करण्यास मदत करणार आहे. आम्ही सोन्याचे नाणे व झाडू देखील खरेदी करणार आहे, जे या खास दिवसासाठी शुभ मानले जातात. मध्यप्रदेशमधील गदारवाडा येथे मोठा झालो असल्यामुळे मला धनत्रयोदशीला असणारा उत्साह आजही आठवतो. बालपणी माझ्यासोबत माझी आई असायची, ती मला खरेदी करण्यास मदत करायची. एकही क्षण माझा हात सोडायची नाही आणि मी प्रत्येक दुकानामध्ये दिसणारे फुगे किंवा खेळणी मागत राहायचो (हसतात). पण ते क्षण खूप खास होते. धनत्रयोदशी सण आपल्याला देवाने दिलेल्या संपत्तीचा आदर करण्याची मोठी शिकवण देतो. पण माझा दृढ विश्वास आहे की, आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. या शुभप्रसंगी आपण सर्वांनी एकमेकांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी शारीरिक, भावनिक व आध्यात्मिक कल्याणाकरिता प्रार्थना करूया. माझ्याकडून सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.”