
no images were found
‘अर्जुन बिजलानी म्हणतो, “ऑटोरिक्षा चालवताना मला खूप मजा आली!”
‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’ या मालिकेत मन सांधणारी प्रेमाची ताकद दर्शवणारी कथा शिव-शक्ती यांच्या दैवी नात्याच्या आधुनिक संदर्भात चितारली आहे. ‘स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स’ संस्थेची निर्मिती असलेल्या ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’ मालिकेत अर्जुन बिजलानी हा शिवच्या, तर निक्की शर्मा ही शक्तीच्या मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्यातील अनोख्या नात्याने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवले आहे. ही मालिका सर्व थरांतील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
भारतीय टीव्हीच्या वेगवान क्षेत्रात प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करण्यासाठी कलाकार आपल्या अभिनय क्षमतेच्या क्षमता खूप ताणतात. अर्जुन बिजलानी हा अशा कलाकारांपैकी एक असून तो आपल्या भूमिकेत आकंठ बुडून गेला आहे. आपली भूमिका जास्तीत जास्त वास्तव करण्याचा तो प्रयत्न करतो. सेटवरच व्यायाम करण्यापासून थरारक स्टंट प्रसंग स्वत:च साकार करून अर्जुनने सर्वांनाच प्रभावित करून टाकले आहे. मालिकेतील एका आगामी प्रसंगासाठी अर्जुनने ऑटोरिक्षा कशी चालवायची- हो, तुम्ही योग्य तेच ऐकलेत, ऑटोरिक्षा- ते शिकून घेतले.
अर्जुन बिजलानी म्हणाला, “ऑटोरिक्षा चालवताना मला खूप मजा आली. मी मोटारी आणि बाइक चालवत असलो, तरी ऑटोरिक्षा चालवणं हे माझ्यासाठी एक नवं आणि थरारक आव्हान होतं. रिक्षा कशी चालवायची ते शिकण्यास मला फक्त 5 मिनीटे लागली आणि नंतर केवळ 2 टेक्समध्ये त्या प्रसंगाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. त्यामुळे हा प्रसंग खूपच वास्तववादी झाला. या प्रसंगातील सर्व घडामोडी या अस्सल आणि विश्वासार्ह वाटल्या पाहिजेत, असा माझा आग्रह होता. आगामी विवाह प्रसंगात शक्तीला वाचवण्यासाठी शिव खरोखरच तळमळीने प्रयत्न करीत असल्याचं प्रेक्षकांना वाटलं पाहिजे, असं माझं मत होतं. त्यासाठी मी स्वत: ऑटोरिक्षा चालवणं गरजेचं होतं.”
आपल्या भूमिकेबद्दल अर्जुनची कटिबध्दता उघड दिसत असली, तरी या भूमिकेत तो कठोर निर्धाराने प्रवेश करत असल्याने त्याने ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’ मालिकेतील उत्कंठा आणि अस्सलता वेगळ्याच उंचीवर नेली आहे. शिव हा विवाहस्थळी वेळेवर पोहोचून शक्तीचे रंजनबरोबर होणारे लग्न थांबवू शकतो का, ते पाहणे प्रेक्षकांसाठी खूपच उत्कंठावर्धक ठरेल. रंजनला एक पत्नी आणि मुलगा आहे, हे तो सिध्द करू शकेल का? मग मंदिरा काय करील? ती शिव आणि शक्ती यांना कायमचे विभक्त कशी ठेवेल?