
no images were found
राज्यात भाजपच आघाडीवर
मुंबई : राज्यातील तब्बल २३५९ ग्राम पंचायतींच्या निकालात सध्याचा कल पाहता भाजप आघाडीवर असून महायुती पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार गट असून त्या खालोखाल शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीचा शरद पवार गट, ठाकरे गटाची कामगिरी आहे. ग्रामपंचायतींमधील वर्चस्वाच्या निवडणुकीत आतापर्यंत लागलेल्या निकालामध्ये महायुती आघाडीवर आहे. . विदर्भातील निकालांवर भाजपचा वरचष्मा राहिलेला आहे.