Home मनोरंजन वेदांत कोपर्डे मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्रचा मानकरी

वेदांत कोपर्डे मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्रचा मानकरी

14 second read
0
0
43

no images were found

वेदांत कोपर्डे मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्रचा मानकरी

कोल्हापूर – पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल महाराष्ट्र मिस-मिसेस मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत येथील युवक वेदांत कोपर्डे याने मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र किताब पटकावला. १५० स्पर्धकांमधून विविध फेऱ्यांमधून जिंकत  वेदांत या स्पर्धेत अव्वल राहिला. वेदांत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून वन्यजीव रक्षक म्हणून कार्यरत आहे. याच स्पर्धेत तो ‘बेस्ट फोटोजेनिक’ शीर्षकाचाही मानकरी ठरला. गौरी नाईक आणि जयन पाटील आयोजित या स्पर्धेची संकल्पना गो ग्रीन होती व या स्पर्धेपासून सुरू करत देशभरात दहा लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेत वेदांतबरोबरच पलक शिवकुमारश्री (पुणे), डॉ. प्रीती दिघे (मुंबई) यंदाच्या मिस आणि मिसेस ग्रीन ऑफ महाराष्ट्राच्या  मानकरी ठरल्या, तर आकांक्षा घाटोळे  (नागपूर), डॉ. मानसी रावलेलू, रत्नागिरी (खेड), रश्मी ठाकूर (नाशिक), आश्लेषा बागडे (पुणे), जय शर्मा (ठाणे) डॉ. संदीप कंठाळे (अमरावती) अनुक्रमे मिस, मिसेस आणि मिस्टर गटात प्रथम आणि द्वितीय उपविजेते ठरले. स्पर्धेचे परीक्षण मि. ग्रासिम इंडिया आणि अभिनेता रजनीश दुग्गल,  फेमिना मिस इंडिया, फर्स्ट रनर अप श्रेया पुंजा, ब्युटीपेजंट ऑर्गनायजर मुकेश कणेरी यांनी केले.  मुंबईचे ग्रुमिंग एक्सपर्ट आणि कोरिओग्राफर विशाल सावंत यांनी स्पर्धकांची सर्व तयारी करून घेतली होती. सूत्रसंचालन संदीप पाटील आणि माधुरी सोनी यांनी केले. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट …