
no images were found
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे जिल्ह्यात यशस्वी आयोजन
कोल्हापूर : भ्रष्टाचार जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सकाळी साडेआठ वाजता भवानी मंडप, दुर्गा चौक, बिंदू चौक ते दसरा चौक अशी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. जनतेमध्ये भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने, भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार कुठे घ्यायची व तक्रार करण्याची प्रक्रिया याबाबत रॅलीचे आयोजन करणेत आलेले होते. रॅलीकरीता प्रमुख पाहुणे म्हणून कुस्तीपटू राष्ट्रीय विजेता, उपमहाराष्ट्र केसरी सिंकदर शेख होते. यावेळी पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे, तसेच विनोद चौगुले, हिंदकेसरी, विष्णु जोशिलकर, महाराष्ट्र केसरी, मच्छींद्र निऊगरे, नॅशनल चॅम्पियन (आर्मी), रेश्मा माने वर्ल्ड चॅम्पियन, शिवछत्रपती पुरस्कार विजते, विक्रम कु-हाडे वर्ल्ड चॅम्पियन, शिवछत्रपती पुरस्कार विजते यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले आणि रॅलीत सहभागही घेतला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे यशस्वी आयोजन झाले. रॅलीमध्ये विद्यापीठ हायस्कुल, भवानी मंडप, कोल्हापूर, पद्यमाराजे गर्ल्स हायस्कुल पेटाळा, स.म. लोहिया हायस्कुल, पेटाळा, न्यू हायस्कुल पेटाळा, प्रायव्हेट हायस्कुल, महाराष्ट्र हायस्कुल, कोल्हापूर हायस्कुल, आर्यव्हिन हायस्कुल, नागोजीराव पाटणकर हायस्कुल, साकोली कॉर्नर, दादासाहेब मगदुम हायस्कुल (महावीर कॉलेज) या विद्यालयातील एनसीसी / आरएसपी, व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. रॅली मध्ये भ्रष्टाचार विरूध्द जनजागृती करणेकरीता वेगवेगळे घोषवाक्य, ब्रीदवाक्य यांचे फलक करून त्यांच्या हातात देवुन जनजागृती करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील टोल फ्री क्रमांक, दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक फेसबुक लिंक याची माहिती दिली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध विविध जनजागृतीपर घोषणाही दिल्या. रॅलीमध्ये कोल्हापूर महानगरपालिका कडील अग्नीशमक दलाकडील फायरब्रिगेड चे वाहन, तसेच रॅलीमधल सर्वांची दक्षता घेणेकरीता सीपीआर हॉस्पीटल कोल्हापूर यांचेकडून वैद्यकीय अधिकारी यांचेसह ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच रॅलीचे वाहतूक नियमनकरीता कोल्हापूर वाहतूक शाखा यांचेकडील अधिकारी व २० कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित रॅलीमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी, शिक्षक, इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे अल्पोपहार ची सोय करण्यात आली होती. तसेच रॅली चा समारोप झालेनंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी यांना सरकारी वाहनाने सुरक्षीतरित्या त्यांचे शाळेच्या प्रवेशव्दारावर सोडण्यात आले. रॅली करीता ५०० ते ६०० विद्यार्थी विद्यार्थीनी, शिक्षक स्टाफ व विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर पोलीस दलाकडून एक लाईट मोटार व्हॅन (चित्ररथ) भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने भवानी मंडप, दुर्गा चौक ( बिंदू चौक) ते दसरा चौक अशी जनजागृती रॅलीमध्ये समाविष्ठ होता. त्यानंतर चित्ररथ चे मोटार व्हॅनवरती स्पिकर लावून भ्रष्टाचार व लाचेसंबंधी तक्रार देण्याचे आवाहन करणा-या ध्वनफीत लावून वाहन कोल्हापूर परिसरातील सी.बी.एस. स्टॅन्ड कोल्हापूर, गंगावेश, रंकाळा या भागामध्ये मुख्य चौकात, एस.टी. स्टॅण्ड तसेच गर्दिच्या ठिकाणी थांबून सकाळी व सांयकाळी प्रबोधन करण्याचे काम करण्यात आले. तसेच चित्ररथामधील अंमलदार यांचे मार्फत लोकांना भ्रष्टाचाराविरूध्दच्या तक्रारी देणेबाबत प्रोत्साहीत करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील टोल फ्री क्रमांक, दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक फेसबुक लिंक याची माहिती दिली. तसेच पत्रके वाटण्यात आली. रॅलीची सांगता दसरा चौक येथील जैन बोर्डिंग वस्तीगृहमध्ये करण्यात आली. पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी सहभागी सर्व विद्यार्थी, पाहुणे, विविध कार्यालयाचे प्रमुख, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे यावेळी आभार मानले.