Home मनोरंजन स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार नाच गं घुमा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार नाच गं घुमा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

12 second read
0
0
13

no images were found

स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार नाच गं घुमा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

 

चार वर्ष सातत्याने नंबर वन रहात स्टार प्रवाह वाहिनीने मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत भरभरुन मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच प्रयत्न केला आहे. अनेक उत्तमोत्तम मालिकांसोबतच नवनवे दर्जेदार चित्रपट स्टार प्रवाह वाहिनी सादर करीत असते. वेड, झिम्मा, बाईपण भारी देवा, पावनखिंड यासारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर स्टार प्रवाहवर ‘नाच गं घुमा’ या नव्याकोऱ्या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे. नोकरदार महिला आणि तिच्या दैनंदिन आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणारी मोलकरीण बाई यांच्या नात्याची गंमतीशीर गोष्ट ‘नाच गं घुमा’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. फक्त महिला वर्गच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आपलीशी वाटेल. मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट प्रत्येकानेच पाहायला हवा.

नाच गं घुमा च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरविषयी सांगताना स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चरचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्टार प्रवाह वाहिनी नेहमी दर्जेदार आशय रसिकांना देत असते. नाच गं घुमा अशीच एक धमाल पण रोजच्या जीवनातील संबंधित चित्रपट आहे जो आशय आणि करमणुकीची सुंदर सांगड घालून देतो. घरातल्या प्रत्येकासाठी हा चित्रपट रसिकांसाठी करमणुकीची मेजवानी असेल.’

तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहायला विसरु नका नाच गं घुमा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार २० ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…