no images were found
आयआरबीच्या चिपी परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाला २४ X ७ – सर्वकालीन हवामान चालनासाठीची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची मान्यता
• कोकण प्रदेशाचे प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे महत्वपूर्ण अद्ययावतीकरण
सिंधुदुर्ग: आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड द्वारा संचालित आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाने एक महत्वपूर्ण अद्ययावतीकरण साध्य केले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सिंधुदुर्ग विमानतळाला २४x७ दिवस-रात्र सार्वकालीन हवामानात विमान चालना करीत मान्यता दिली आहे. या मान्यते मुळे कमी दृश्यमानता आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीत देखील विमान-चालन सक्षम करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स (आयएफआर) साठी विमानतळ प्रमाणित झाले आहे.
या मंजुरीत उपग्रह आधारित आवश्यक नेव्हिगेशन परफॉर्मन्स (RNP) प्रक्रिया आणि बॅकअप नेव्हिगेशन मदतीची उपलब्धता यांचा समावेश आहे. या प्रणाली वैमानिकांना उपकरण दृष्टिकोन मार्गदर्शन आणि विश्वासार्ह नॉन-सॅटेलाइट बॅकअप एकत्रितपणे प्रदान करतात, ज्यामुळे वर्षभर सर्व प्रकारच्या विमानांसाठी सुरक्षित लँडिंग आणि अधिक विश्वासार्ह उड्डाणे सुनिश्चित होतात.
सिंधुदुर्ग विमानतळावरील प्रवाशांच्या वाढत्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर ही मान्यता मिळणे हा अत्यंत महत्वपूर्ण टप्पा आहे. डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच विमानतळाने जवळपास ११,००० प्रवाशांची वर्दळ नोंदवली; आणि आता मासिक प्रवासी संख्येनुसार ते भारतातील शीर्ष ७५ विमानतळांमध्ये स्थान मिळवेल, अशी अपेक्षा आहे. या वाढत्या प्रवासी संख्या हाताळणीच्या दृष्टीने, विमानतळाची पार्किंग क्षमता दुप्पट करण्यात आली असून, आता तीन ऐवजी सहा विमाने एकावेळी पार्क करता येणे शक्य आहे. या मुळे कोकणप्रांता साठी भविष्यातील विमान वाहतूक प्रवेशद्वार म्हणून सिंधुदुर्गचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
या प्रसंगी भाष्य करताना, आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार आणि प्रमुख कॅप्टन जय एस सदाना म्हणाले, “२४x७ सर्वकालीन हवामानातील कामकाजासाठी मंजुरीमुळे विमानतळाची विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होते. यामुळे विमान कंपन्यांचा आत्मविश्वास वाढेल, वाहतूक वाढीस चालना मिळेल आणि कोकण प्रदेशातील आर्थिक आणि पर्यटन विकासात अर्थपूर्ण योगदान मिळेल. या करीता नियामक प्राधिकरण व अधिकारी आणि सरकारचे त्यांच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत.” ते पुढे म्हणाले, “राज्य प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-सिंधुदुर्ग विमान मार्ग देखील येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा असून यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी सुधारणा होईल व कोकण प्रदेशातील रहिवाशांसाठी प्रवास अधिक सुखकर व सोयीस्कर होईल आणि संपूर्ण भारतातील पर्यटकांचे स्वागत कोंकण प्रांतात स्वागत करणे कोंकणवासीयांना शक्य होईल.”
आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळा बद्दल:
आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळ कोकण प्रदेशाच्या विकासासाठी, कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि आर्थिक विकास वाढविण्यासाठी एक प्रमुख उत्प्रेरक म्हणून उदयास येत आहे. खाजगी गुंतवणुकीने बांधलेला आणि भारत सरकारच्या उडान धोरणांशी सुसंगत असलेला हा विमानतळ आधुनिक प्रादेशिक विमान वाहतूक पायाभूत सुविधांचा प्रभाव दर्शवतो.
कुडाळपासून २१ किमी आणि गोवा (मोपा) पासून ५६ किमी अंतरावर असलेल्या वेंगुर्ला येथील परुळे-चिपी येथे धोरणात्मकदृष्ट्या स्थित असलेले सिंधुदुर्ग विमानतळ विस्तृत कोकण पट्ट्यासाठी आणि दक्षिण गोव्यासाठी प्रवेशद्वार म्हणून काम करतो. प्रतिमास १०,००० हून अधिक प्रवाशांची वाहतूक, सहा विमान पार्किंग बे आणि आयएफआर-समर्थित सर्वकालीन हवामान ऑपरेशन्ससह, हा विमानतळ एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम प्रादेशिक केंद्र म्हणून आपली भूमिका सातत्याने मजबूत करत आहे.