no images were found
महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात केंद्रनिहाय मतदार यादी नागरिकांसाठी उपलब्ध
कोल्हापूर,( प्रतिनिधी ): कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मतदान केंद्रनिहाय मतदार यादी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मतदार यादी मतदान केंद्रनिहाय तयार करण्यात आली असून नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर केंद्रनिहाय मतदार याद्यांची विना छायाचित्र असलेली सॉफ्टकॉपी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://web.kolhapurcorporation.gov.in/getElectionListByYear?ele_ele_yr_id=4 या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तसेच छापील (प्रिंट केलेल्या) मतदार याद्या नागरिकांना पाहण्यासाठी व विक्रीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील छत्रपती ताराराणी सभागृह (स्थायी समिती सभागृह) येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या याद्यांची विक्री प्रति पान २ रुपये या दराने करण्यात येणार आहे.