Home मनोरंजन शेमारु मराठीबाणा वाहिनीवर  सौ. प्रताप मानसी सुपेकर 

शेमारु मराठीबाणा वाहिनीवर  सौ. प्रताप मानसी सुपेकर 

32 second read
0
0
49

no images were found

शेमारु मराठीबाणा वाहिनीवर  सौप्रताप मानसी सुपेकर 

 

पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात बायकांसाठी कायम पुरुषांपेक्षा वेगळे नियम आहेत. स्त्री-पुरुषातलं प्रेमाचं नातं असो की संसार त्यात कायम तडजोड करण्याची, घर सांभाळण्याची, मुलांवर संस्कार करण्याची, नवऱ्याची आणि त्याच्या घरच्यांची मर्जी सांभाळण्याची जबाबदारी बाईलाच पार पाडावी लागते. लग्नानंतर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं ज्याची सुरुवात होते तिचं नाव बदलण्यापासून. आजवर माहेरच्या आडनावाने ओळखली जाणारी ‘ती’ लग्नानंतर नवऱ्याचं आडनाव लावते, नव्हे अभिमानाने मिरवते. मात्र आपल्या बायकोचं नाव अभिमानाने मिरवणार्‍या पुरुषाची चेष्टा होते. समाजाकडून होणार्‍या चेष्टेकडे दुर्लक्ष करत, आपल्या सौभाग्यवतीची कायम साथ देणार्‍या सौभाग्यवंताची गोष्ट म्हणजे  सौ. प्रताप मानसी सुपेकर. शेमारू मराठीबाणा या वाहिनीवरून, येत्या ३० ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

ही कथा आहे वाहतूक पोलिस विभागात कार्यरत असणाऱ्या प्रताप आणि मानसी यांची. मानसी वाहतूक विभागात प्रतापपेक्षा वरच्या हुद्दयावर काम करते. एकत्र काम करताना मानसीची कर्तव्यदक्षता बघून प्रतापच्या मनात मानसीविषयी आदर निर्माण होतो आणि हळूहळू यांची मने जुळतात.  प्रतापच्या मनात मानसी विषयी जेवढं प्रेम आहे त्यापेक्षा जास्त तिच्याबद्दल आदर आहे. त्याच्यासाठी ती केवळ वरिष्ठ अधिकारी नाहीये तर मार्गदर्शकही आहे. मानसीलाही प्रतापचा स्वभाव आणि प्रामाणिकपणा भावतो. या दोघांच्या प्रेमाला मात्र प्रतापच्या घरच्या मंडळीचा विरोध आहे. या लग्नामुळे प्रताप बायकोच्या ताटाखालचं मांजर बनेल अशी भीती त्याच्या घरच्यांना आहे. बायकोला खंबीर साथ देणारा, तिला आपल्या पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या प्रसंगी  प्रवृत्त करणार्‍या प्रतापची फक्त त्याच्या घरी आणि ऑफिसमध्येच नाही तर एकूणच समाजात चेष्टा होऊ लागते, ‘सौ प्रताप’ असं उपहासाने त्याला हिणवलं जाऊ लागतं. अशा निर्णायक वेळी प्रताप-मानसीचं नातं डळमळीत होईल की त्यांच्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाईल, हे आपल्याला पाहायला मिळेल, ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ या नव्या मालिकेतून.

आपल्या विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन देणाऱ्या शेमारू मराठीबाणा वाहिनीने आता नव्या कथांचं हे दालन प्रेक्षकांसाठी उघडलं आहे. याच दालनातील ही नवी भेट असलेली सौप्रताप मानसी सुपेकर ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास वाहिनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…