no images were found
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्तासंघर्षाच्या आदेशावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सोमवारी महत्त्वाचा आदेश दिला. यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर ३१ डिसेंबरआधी निर्णय घेण्यास सांगितले. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात उद्धव ठाकरेंनी देशातील लोकशाही धोक्यात आल्याचं म्हटलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्याायलयाने जे आदेश दिले आहेत त्यावर बोलणं भाग आहे. अपात्रतेचा निर्णय तर आहेत, पण आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व काय आहे, काय असणार आहे त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांती घटना व देशातील लोकशाही टीकणार की नाही हे ठरणार आहे. याकडे देशातील नागरिकांचं नाही, तर जगाचं लक्ष आहे.”