
no images were found
सक्रिय राजकारणातून निलेश राणे बाहेर
भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणाला रामराम ठोकला आहे. राजकारणात आता मन रमत नाही, असं सांगत त्यांनी राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं आहे. X या समाजमाध्यमातून याबाबतची पोस्ट करून दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे.
निलेश राणे यांनी X पोस्टवर म्हटलंय की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम मिळालं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे.