
no images were found
“जागर स्त्री शक्तीचा” विशेष कार्यक्रमाचे बुधवारी कोल्हापुरात आयोजन
कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात “जागर स्त्री शक्तीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिली आहे.
“जागर स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमांतर्गत दिनांक १८ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि.१८ ऑक्टोबर २०२३ रोजी कोल्हापुरात तर राज्यातील महसुली विभागाची मुख्यालये व साडेतीन शक्तीपीठे या ठिकाणी महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने सर्व तयारी केली आहे. या कार्यक्रमामधून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजना व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील 10 ठिकाणी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून, या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री. विकास खारगे, मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
दिनांक 18 ते 23 आक्टोंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्राच्या 06 महसुली विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी (मुंबई, पुणे, नाशिक, छ.संभाजीनगर, अमरावती व नागूपर ) तसेच साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी ) नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 18 आक्टोंबर, 2023 रोजी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री तथा वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य श्री. हसन मुश्रीफ श्री राजेश क्षीरसागर, मा. कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन आयोग, श्री प्रकाश आंबेडकर, मा. उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषी प्रशिक्षण व संशोधन परिषद, श्री धनंजय महाडिक, मा. सदस्य राज्यसभा, श्री संजय मंडलिक, मा. सदस्य लोकसभा, युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, माजी सदस्य राज्यसभा, श्री अरुण लाड, मा. सदस्य विधान परिषद श्री जयंत तासगावकर, मा. सदस्य विधान परिषद, श्री पाटील सतेज पाटील, मा. सदस्य विधानसभा श्रीमती जयश्री जाधव सदस्य, मा. विधानसभा, श्री राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर हे मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.