
no images were found
‘महात्मा गांधींचा सामाजिक समावेशनाचा दृष्टीकोन’ विद्यापीठात विशेष व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर : ‘महात्मा गांधींचा सामाजिक समावेशनाचा दृष्टीकोन’ या विषयावर शिवाजी विद्यापीठातील सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्यावतीने मंगळवार, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी श्री. किशोर बेडकिहाळ यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रा. डॉ. एस. एस. महाजन हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये हे व्याख्यान सकाळी ठीक १०:३० वा. सुरू होईल. तरी सदर व्याख्यानास प्राध्यापक, विद्यार्थी,
संशोधक, सामजिक कार्यकर्ते इत्यादींनी उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. एस. एस. महाजन व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.