
no images were found
भाषेच्या विद्यार्थ्यानी वाचन संस्कृती जपली पाहिजे- डॉ. व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागामार्फत यू. जी. सी. दिल्ली ने दिलेल्या निर्देशाप्रमाणे भारतीय भाषा उत्सव हा कार्यक्रम आयोजित केला होता. हिंदी, संस्कृत, मराठी, बुंदेलखड़ी, अवधी, मैथिली, मारवाड़ी, उर्दू, या भाषांचा परिचय देणारे पोस्टर प्रदर्शन विद्यार्थ्यानी भरवले होते. याचे उदघाटन भारतीय जीवन बीमा निगमचे कोल्हापुर शाखेचे कार्मिक ओ औद्योगिक संबंध विभागाचे मुख्य प्रबंधक श्री. राजेंद्र पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठचे
कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.
या प्रसंगी ते बोलत होते .भाषेच्या विद्यार्थ्यानी वाचा ,वेचा, साठवा, आणि उपयोगात आणा या चतु:सूत्रीतुन वाचन संस्कृती जपली पाहिजे असे मार्गदर्शन डॉ. शिंदे यांनी केले. प्रमुख उपस्थिती इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रभंजन माने यांची होती. प्रास्ताविक प्रा. डॉ. चंदा सोनकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगितला. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. विजय सदामते यांनी करुन दिला. सूत्रसंचालन कु. अमृता कांबले हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.