Home शासकीय सेनापती कापशीतील 566 घरकुलांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या-  हसन मुश्रीफ 

सेनापती कापशीतील 566 घरकुलांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या-  हसन मुश्रीफ 

40 second read
0
0
37

no images were found

सेनापती कापशीतील 566 घरकुलांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या-  हसन मुश्रीफ 

                 

कोल्हापूर : सेनापती कापशी ता. कागल येथील 566 ग्रामस्थांची घरे शेतीच्या सातबारामध्ये बांधलेली आहेत. गेल्या 50 वर्षात सिटी सर्वे झालेला नाही. त्यामुळे कर्ज प्रकरण, तारण, वारसा नोंदी, खरेदी -विक्री, डागडुजी करताना अडचणी येतात. या सर्व घरकुलधारकांचा तातडीने सिटीसर्वे करून प्रॉपर्टी कार्ड द्या, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत घरकुलधारक व प्रशासनाची बैठक झाली.

          याबाबत अधिक माहिती अशी, विस्तारणाऱ्या सेनापती कापशी या मोठ्या गावामध्ये मुख्य गावठाणासह आजूबाजूला वाड्या- वस्त्यांवर जोडणारे रस्ते आहेत. त्यामुळे, ग्रामस्थांनी सोयीनुसार शेतीमध्ये सातबारा उताऱ्यात घरे बांधलेली आहेत. गेल्या ५० वर्षात सिटी सर्वे झाला नाही. दोनवेळा गावठाण हद्दवाढ होऊनही ही घरकुले गावठाणाबाहेरच राहिली. परिणामी प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे या घर मालकांना अनेक अडचणी येत आहेत.

           यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, रविवारी दि. १६ जून रोजी लगतच्या नंबरचा सर्वे करा. सोमवारी दि. १७ जून रोजी  ग्रामपंचायतीचे अनुषंगिक ठराव गोळा करा.  मंगळवारी दि. १८ जून रोजी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा . एक आठवड्याच्या आत प्रस्ताव मंजूर करून महिना ते दीड महिन्याच्या आत ड्रोनद्वारे सिटीसर्वे करुन प्रॉपर्टी कार्ड दिली जातील, असे नियोजन करा.

            यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत, सरपंच उज्वला कांबळे, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ काळबांडे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, सुनील चौगुले, उपसरपंच सौरभ नाईक, सुनील चौगुले,  प्रवीण नायकवडी, इसाक मकानदार, सूर्यकांत भोसले, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…